अहमदनगर प्रतिनिधी / शेख युनूस : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाच्यावतीने निवडणूक लढविण्यात आली असता या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा सभापती पदावर साकुर येथील आदर्श सरपंच शंकरराव खेमनर यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती पदावर यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाच्या पक्षाचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
साकुर येथील शेतकरी पक्षाचे खंबीर कार्यकर्ते भाई भाई रोप वाटीकेचे मालक आल्लीभाई मोमीन व बॉम्बे टीव्ही चे मालक लतीफ भाई मोमीन यांच्या कुटुंबियांच्या वतीने शंकरराव खेमनर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.या वेळी उपस्थित भाई भाई रोप वाटीकेचे मालक आल्लीभाई मोमीन, बॉम्बे टीव्ही व बॉम्बे इलेक्ट्रॉनिक चे मालक लतीफभाई मोमीन, आयुबभाई मोमीन आळेफाटा, निसारभाई पटेल, भैया भाई शेख, विठुराज मैड साहेब शेख मोमीन परिवार.
बॉम्बे टीव्ही व भाई भाई रोपवाटीका साकूर यांच्या कुटूंबीयांच्या वतीने आदर्श सरपंच शंकर खेमनर यांचा जाहीर सत्कार

0Share
Leave a reply