Disha Shakti

इतर

चुलीत गेले तुमचे शिक्षण म्हणण्याची वेळ डॉ.अरुण गोधमगावकर यांचे वृद्धाश्रमातच निधन

Spread the love

नांदगाव तालुका प्रतिनिधी / खंडू कोळेकर : डाॅ. अरुण गोधमगांवकर सर, हे एक नामांकित बालरोग तज्ञ डॉक्टर होते.त्यांनी आयुष्यभर अनेक बालकांना जीवनदान दिले.ते मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी वृद्धाश्रमात राहत होते. ते नांदेड जिल्ह्यातील मूळचे नायगाव तालुक्यातील गोधमगाव चे होते, परंतु ते नंतर बिलोलीला स्थायिक झाले होते

ते स्वतःच्या मुलाला एम. डी. डॉक्टर व मूलीलाही स्री रोग तज्ञ डॉक्टर करून, काही वर्षापू्र्विच त्या दोघांनाही अमेरीकेला पाठवले होते, सून व जावई ते पण डॉक्टरच आहेत, सगळेच आपापल्या जीवनात व्यस्त असल्याने, आई वडीलाकडे लक्ष द्यायला कोणिच रिकामे नव्हते.

उतारत्या वयात डॉक्टर साहेबांच्या पत्निचे निधन झाले, त्यावेळेस देखील अमेरिका मधून त्यांचा ना मूलगा आला, ना ही मूलगी आली, मग गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. त्यानंतर डॉक्टर साहेब लातूर जिल्ह्यातील अहमदपूर य़ेथे रुक्मिणी वृद्धाश्रम मध्ये रहायला गेले, चार वर्षाचा काळ तेथे व्यतीत केला, आणि नुकतेच डॉ.अरुण गोधमगावकर सर यांचे दुःखद निधन झाले.

वृद्धाश्रम चालकाने त्यांच्या अमेरीकास्थीत मुलगा, मुलगी आणि जावई यांना निरोप कळवला, परंतु “कोणाचेही य़ेणे होणार नाही, आमचा कसलाही आक्षेप नाही, तूम्ही अंत्यविधी कार्यक्रम ऊरकून घ्या”,असे सांगितले.अखेर तेथील आश्रमवासीयांनी अतिशय जड अंतकरणाने डॉक्टरांना अश्रूनयनांनि निरोप दिला.

शेवटी मनात विचार येतो की, कोणी नाही कोणाचे, हूशारी-धन काय कामाचे? पोरबाऴ कोणाचे? घर संसार कोणाचा? लेकी – सूना कोणाच्या? शेवटी कोणीच कोणाचे नाहीत का? मरावे एकट्यालाच लागले, अशी वाईट परीस्थीती आहे.समाज अतिशय वाईट परीस्थितीतून जात आहे असे वाटते. जी परिस्थिती डॉक्टरांवर आली ती कुणावरच येऊ नये.

ज्या माता पित्याची स्वतः जन्म दिलेली मुले जर, त्या माता पित्याला वृद्धाश्रमामध्ये पाठवतात, आणि शेवटी त्यांच्या अंत्यविधीलाही त्यांना यायला अजिबात वेळ नाही, त्यापेक्षा मोठे दुर्दैव, त्या मातापित्यांसाठी दुसरे कोणतेच असू शकत नाही. यातुन एक गोष्ट सिध्द होते कि शिकून सुशिक्षीत होण्यापेक्षा अडाणी राहुन सुसंस्कृत राहिलेल कधीही चांगलं. आपल्या आई वडीलांची काळजी घेणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!