बिलोली प्रतिनिधी- साईनाथ गुडमलवार
बिलोली येथे गांधीनगर परिसरामध्ये दि. 3 जुन ते 7 जुन 2023 या दरम्यान बिलोली चे मा.नगराध्यक्ष श्री संतोष कुलकर्णी यांच्या पुढाकारातून सद्गुरु श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या अमृत रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत कथा, सद्गुरु श्रीगुंडामहाराज यांच्या अभंग गाथेचे पारायण, हरीपाठ, काकडा भजन व महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन संपन्न होणार आहेत. या सत्संगात बिलोली परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपले परमार्थिक जीवन धन्य करून घ्यावे, असे आवाहन मा.जि.प.सदस्य श्री लक्ष्मणराव ठक्करवाड साहेब यांनी केले आहे.
या संपूर्ण उत्सवा संदर्भात सविस्तर चर्चा व पूर्वनियोजन करण्यासाठीची बैठक दि.14.05.23 रोजी गांधीनगर बिलोली येथे संपन्न झाली. या संपूर्ण उत्सवामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल.पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 8 ते 10 सद्गुरु श्रीगुंडामहाराज यांच्या अभंग गाथेचे पारायण, दुपारी 2 ते 5 सद्गुरुंच्या अमृतवाणीतून श्रीमद्भागवतकथा, सायंकाळी 05.30 ते 06.30 हरिपाठ, रात्री 8 ते 10 महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ज्यामध्ये ह.भ.प. श्री रामराव महाराज ढोक, ह भ प श्री पांडुरंग महाराज घुले, ह भ प श्री उमेश महाराज दशरथे, ह भ प श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांची कीर्तन होतील व कार्यक्रमाची सांगता सद्गुरु श्रीचंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या किर्तनांनी होईल.
या कथेचा व उत्सवाचा जास्तीत जास्त भाविकभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या बैठक प्रसंगी – प्रमुख उपस्थिती ह.भ.प.श्रीमहेशमहाराज वाढवणकर ,श्री संजय बेळगे मा.सभापती,लक्ष्मण ठक्करवाड मा.जि.प.सदस्य,मैथिली संतोष कुलकर्णी मा.नगराध्यक्षा,संतोष कुलकर्णी मा.नगराध्यक्ष, मारोती पटाईत मा.नगराध्यक्ष, साहेबराव बागेलवाड सेवानिवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी,शैलेश ऱ्याकावार मा.नगरउपाध्यक्ष कुंडलवाडी, अनुदत्त रायकंठवार प्रतिष्ठित व्यापारी, गोविंद अंजनीकर, बालाजी मुखेडी, मारोती पटाईत, प्रा.शिवकुमार सरकोंडावार, सदगुरुंचा शिष्य परिवार,भाविक भक्त उपस्थित होते.
या नियोजन बैठकीचे सूत्रसंचलन प्रा.गोपाळ चौधरी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार श्री संतोष कुलकर्णी यांनी मानले व अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची पूर्वनियोजित बैठक संपन्न झाली.