राहुरी प्रतिनिधि / ज्ञानेश्वर सुरशे : दिव्यांग व्यक्तींना मंगळवार (ता. १६) सहायक साधनांचे वाटप होणार आहे. विदळघाट येथील दिव्यांग पुर्नवसन केंद्रात सकाळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांच्या हस्ते दिव्यांग सहायक साधने वाटपाचा हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी दिली. ओएई तपासणी केंद्राचे उद्घाटन प्रातिनिधिक स्वरूपात १५ दिव्यांग विद्यार्थ्यांना सहायक साधनांचे वाटप होणार आहे. या योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील ३९० दिव्यांगांना जून महिन्याअखेर साहित्याचे वाटप होणार आहे.
विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित दिव्यांग पुर्नवसन केंद्र सन २०१८ पासून दिव्यांग क्षेत्रात काम करत आहे. ओमप्रकाश देशमुख यांच्या हस्ते लहान बाळांमधील कर्णबधीरपण तपासणीच्या ओएई केंद्राचे उद्घाटन होणार आहे
Leave a reply