अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस
राहुरी : केंदळ खुर्द चंडकापूर शिव रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी मुळा धरण प्रकल्पग्रस्त श्रीमती शेऊ बाई विठ्ठल दोंदे,आशोक विठ्ठल दोंदे व पवार कुटुंब यांनी राहुरी तहसील कार्यालयासमोर येथे नऊ दिवस बेमुदत आमरण उपोषण केले त्या उपोषणाला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री राजाभाऊ आढाव यमुनाताई भालेराव व प्रहार जनशक्ती पक्षाची राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील बाबासाहेब मकसारे भारत जगधने मच्छिंद्र धावडे केंदळचे सरपंच उपसरपंच सदस्य नागरिक व इतर अनेक पक्ष संघटनेचे कार्यकर्त्यांनी पाठिंबा देऊन या सर्व पिढीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.
मुळाधरण प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना साठ वर्षात रस्ता पाणी नाही हे मोठे दुर्दैव लांबे केंदळ खु-चंडकापुर शिव रस्ता खुला करुण मिळण्या बाबतचे उपोषण अखेर 9 व्या दिवशी-अभियंता सायली पाटील यांनी मला 8 दिवस द्या, मि शिव रस्ता वरील पाणी चारी अनाधिकृत असेल तर स्थळ निरीक्षण करुण सर्व चौकशी करुण उपोषण कर्ते सर्व पिडीत शेतक-यांना न्याय मिळवुन देईल असे लेखी आश्वास देऊन लिंबु पाणी शरबत देऊन 80 वर्षाच्या आजी व ईतर सहा पिढीत शेतकरी 9 दिवस उपोषणास बसलेल्या श्रीमती शेवबाई विठ्ठल दोंदे यांना मुळा पाटबंधारे विभागाच्या कर्तव्यदक्ष जिल्हा मुख्य अधिकारी अभियंता,सायली पाटील मॅडम यांच्या मध्यस्थीने सोडले यावेळी राहुरी तहसिल नायब तहसिलदार दंडिले मॅडम, सुनिलराव औटी साहेब,रिपब्लीकन पक्षाचे जिल्हाअध्यक्ष राजुभाऊ आढाव,यमुनाताई भालेराव,प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष-श्री सुरेशराव लांबे पाटील,बाबासाहेब मकासरे,भारत जगधने, मच्छिंद्र धावडे,व ईतर शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.