नांदगांव प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे : रब्बी हंगाम २०२३-२४ मधिल मका व जवारी खरेदी करण्यासाठी आमदार सुहास (आण्णा) कांदे यांचे प्रयत्नातून फेडरेशन मार्फत आधारभूत किंमतीत नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शनैश्वर नांदगांव तालुका खरेदी विक्री संघामार्फत मका व जवारी खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असुन २० मे २०२३ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार असुन त्या नंतर कोणत्याही प्रकारची नोंदणी करण्यात येणार नाही.
त्यानंतर महाराष्ट्र फेडरेशनच्या सूचना आल्यानंतर बाजार समितीच्या आवारात मका व जवारी खरेदी केंद्र सुरु करण्यात येईल. त्यामुळे नांदगांव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले मका व जवारी विक्रीसाठी आणून शासकीय हमिभावाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार सुहासआण्णा कांदे, शनैश्वर नांदगांव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विलास आहेर, तहसिलदार सिद्धार्थ मोरे, बाजार समितीचे प्रशासक, सचिव अमोल खैरनार, आदींनी केले आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी चालू वर्षाचा रब्बी हंगाम पिक पेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, खातेउतारा, बँकेचे पासबुक (जनधन खाते नसावे) आधार कार्ड व मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांसह नांदगांव बाजार समितीत श्री कचरादास गांधी यांना 9420230777/ 7385329966 संपर्क करावा. असे आव्हान तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्यावतीने करण्यात आले आहे.