प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे : श्री.धुळदेव-भिवाई देवी पायी दिंडी सोहळा २०२३ सोहळ्याचे आयोजनभगवंताने जे दिले त्यात समाधान असून इतर काही हवे असे न वाटणे म्हणजे वैराग्य होय वै.नांजूबाबा, वैराग्यमूर्ती कोंडीराम भाऊ कोकरे, वैराग्यमूर्ती धूळबाबा कोकरे यांच्या धुळूभक्त परंपरेचा वारसा जपत श्री बारकू नाना कोकरे, श्री दशरथ भाऊ शिंदे, यांच्या प्रेरणेतून व पोपट देवा कोकरे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली बारा वर्षापासून चालत आलेल्या श्री धुळदेव भिवाई देवी पायी दिंडी सोहळा परंपरा चालू ठेवण्याच्या उद्देशाने धनगर समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेले धुळोबा देवाला अखंड समाजाच्या दुःखी- पीडित जनाच्या सुख- शांती , कल्याणासाठी साकडे घालण्यासाठी सर्व समाज बांधवांच्या वतीने श्री धुळदेव भिवाई देवी पायी दिंडी सोहळा देवस्थान फलटण या ठिकाणापर्यंत आयोजित करताना यावर्षीही गुरुवार दिनांक 25/05/2023 रोजी श्री शेत्र बालाजी देडगाव येथून दिंडी सोहळ्यास प्रारंभ होणार होणार आहे. दिनांक 25/05/2023 ते रविवार दिनांक 04/ 06 /2023 या कालावधीत आयोजित करण्याचे योजले आहे.
विशेष सहकारी, डफ -सनई वादक, ढोल वादक , आचारी, संपर्कप्रमुख व आयोजकांच्यावतीने व सहकार्याने दिंडी सोहळ्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. नांदगाव तालुक्यातील समाज बांधवांना जास्तीत जास्त संख्येने दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन मार्गदर्शक श्री पोपट (दादा) कोकरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Leave a reply