प्रतिनीधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यात 1970/71 साली मुळाधरण प्रकल्प होण्यासाठी अनेक गावातील शेतक-यांनी प्रकल्पासाठी आपले रहाते घर जमीन देऊन प्रकल्प होण्यासाठी शासनाला व प्रशासनाला सहकार्य केले,त्या मोबदल्यात ईतर ठिकाणी जमीन व नोकरी देन्याचे शासनाने कबुल केले काही प्रकल्प ग्रस्थ शेतक-यांना अजुनही नोकरी मिळाली नाही,तर काही शेतक-यांना पुनर्वसनामंधे शेती मिळाली त्यातील एक कै.विठ्ठल गर्भाजी दोंदे हे एक प्रकल्पग्रस्त शेतकरी असुन ते काही वर्षापुर्वी मयत झाले,त्यांना केंदळ खुर्द शिवारात गट नंबर 183/2 क्षेत्र 81 आर जमीन शासनाने दिली परंतु त्या जमीनीमंधे जान्यासाठी आज पर्यत हक्काचा रस्ता दिलेला नाही,व ज्या पाणी प्रकल्पासाठी घर दार गाव सोडले त्या प्रकल्पाचे पाणी ही त्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांला आज पर्यत मिळाले नाही ही बाब अतीशय लाजीरवाणी आहे असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष सुरेशराव लांबे व रिपब्लीकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ आढाव यांनी खंत व्यक्त केली
पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि केंदळ खु येथील श्रीमती शेवबाई विठ्ठल दोंदे,अशोक विठ्ठल दोंदे,सर्जेराव रावसाहेब पवार,बाळासाहेब दगडु पवार,राजेद्र रावसाहेब पवार,सिंधु सर्जेराव पवार, यांची शेत जमीन केंदळ खुर्द शिव लगत आहे या सर्व पिडीत शेतक-यांनी अनेक वर्षापासुन शासनाकडे केंदळ खुर्द व चंडकापुर शिव रस्ता खुला करन्यासाठी मागणी केलेली असुन त्यासाठी पुनर्वसन मंत्र्यांचे पत्र ही तहसिलदारांना दिले तरीही तहसिलदारांना भुमिअभिलेख विभाग व मुळा पाटबंधारे विभाग यांच्या स्थानिक माहीती अहवालात शिवरस्ता येथे पाट चारी आहे असे लेखी नमुद केल्यामुळे तहसिलदार यांना निर्णय घेणे कठीण झाले.
राहुरीचे तहसिलदार राजपुत साहेब,श्रीरामपुर विभाग पोलीस अधिक्षक श्री संदीप मिटके साहेब,राहुरीचे कर्तव्यदक्ष पी आय श्री मेघशाम डांगे साहेब यांनीही पिडीत आंदोलकांन बरोबर चर्चा करुन उपोषन थांबवन्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलकांना कुठलेही लेखी आश्र्वासन मिळत नसल्यामुळे त्यांनी जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर कु.सायली पाटील मॅडम यांच्याकडे दि.17/5/2023/ बुधवार रोजी दुपारी धाव घेतली व तहसिलदारांकडे आलेले अहवाल अमान्य करुण आपले लेखी म्हणने सादर केले,पाटील मॅडम यांनी रिपब्लीकण पक्षाचे नेते श्री राजुभाऊ आढाव,व ईतर कार्यकर्ते यांचे सर्व म्हणने ऐकुन सविस्तर चर्चा केली व मला आठ दिवस द्या मि स्वता पडताळणी करुण स्थळ निरीक्षण करते व तहसिलदारां अहवाल पाठवते अशी लेखी ग्वाही दिली,
तुम्ही उपोषण सोडवा,आंदोलकांनी नऊ दिवस कोणाचेही न ऐकता उपोषण सुरु ठेवले, मात्र त्याच दिवशी त्वरीत नगरहुन राहुरी तहसिल आंदोलण स्थळी मुळा पाटबंधारे अभियंता कु.सायली पाटील मॅडम सायंकाळी 6 वाजता हजर झाल्या व चर्चा केली आंदोलकांनी विश्र्वास ठेवत दिनांक 9 मे रोजी सुरु केलेले उपोषण 17 मे रोजी सायंकाळी नवव्या दिवशी सोडले.
यावेळी आंदोलकांना लिंबु पाणी शरबत देन्यात आले,यावेळी अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागीय अभियंता कु.सायली पाटील मॅडम,राहुरी तहसिलच्या नायब तहसिलदार सौ.दंडीले मॅडम,औटी साहेब,यांच्या पुढाकाराने उपोषन सोडले,
या उपोषनाला,मुख्य पाठींबा व नेतृत्व रिपब्लीकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री राजुभाऊ आढाव,व जेष्ठ नेत्या यमुनाताई भालेराव,प्रहारचे राहुरी तालुकाध्यक्ष श्री सुरेशराव लांबे पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री राजुभाऊ शेटे, वंचित जि.अध्यक्ष विशालभाऊ कोळगे, ता.अध्यक्ष संतोष भाऊ चोळके, जि.संघटक अनिलराव जाधव, बाबासाहेब मकासरे, भारत जगधने, मच्छिदर गावडे, दत्तात्रय पवार, केंदळ खु सरपंच ग्रामस्थ व अनेक पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पाठींबा देऊन पिडीतांना न्याय मिळवुण देन्याचा मोठ्या प्रयत्न केला.
केंदळ खु-चंडकापुर शिवरस्ता खुला करा यामागणीसाठीचे उपोषण अखेर नवव्या दिवशी लेखी आश्वासनानंतर सुटले

0Share
Leave a reply