अ.नगर प्रतिनिधी /शेख युनूस : राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या डोंगराळ, दुर्गम भागातील शेरी चिखलठाण येथील शिवाजी सदाशिव काकडे या शेतकऱ्याने सात ते आठ एक्कर खरबूज चे पीक तयार करून वाशी येथील व्यापाऱ्याला ठरवून दिले असता त्या व्यापारी पिता पुत्राने शेरी चिखलठाण येथील शेतकऱ्याची सुमारे सात लाखाची फसवणूक केली, या प्रकरणी राहूरी पोलीसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदीवला आहे.
सविस्तर माहिती अशी की,दिनेशकुमार रामधन गुप्ता व अंकेत दिनेश कुमार गुप्ता हे दोघेही राहणार ओपन रोड एपि एम सि फ्रुट मार्केट, सेक्टर 19. तुर्भे वाशी नवी मुंबई. अशी संशयित व्यापारी यांची नावे आहेत.शेरी चिखलठाण येथील शिवाजी सदाशिव काकडे वय.47 असे आर्थिक फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे नांव आहे. काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चिखलठाण येथे बागायती शेत जमीन असून त्या शेती पिकावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावा म्हणून त्यांनी आठ एकर जमिनीत कुंदन खरबूजची वाडी केली आणि मार्च 2023 मध्ये खरबूज पीक काढण्यास तयारी केली. यापूर्वीही म्हणजे चार वर्ष्यापूर्वी वाशी मार्केट मधील व्यापारी दिनेश कुमार गुप्ता यांना खरबूज विकले होते,तेच व्यापारी 20 मार्च 2023 रोजी त्यांचा मुलगा अंकेत समवेत चिखलठाण येथील शेती वरील खरबूज वाडी ची पाहणी करून व्यवहार ठरला असता आठ एक्कर खरबूजच्या वाडीची किंमत 15 लाख रुपय ठरली.प्रत्येकी सोमवारी पाच लाख रुपये द्यायचे आणि तीन आठवड्यात खरबूज काढून घ्यायचे असा लिखित व्यवहार झाला.
खरबूज काढणीला सुरुवात झाल्यावर व्यापाऱ्यांने पहिल्या सोमवारी पाच लाख रुपये बँक खात्यावर वर्ग केले. पुढील सोमवारी फक्त दीड लाख पाठवले तिसऱ्या सोमवारी दीड लाख रुपये पाठवले असे सुमारे एकूण आठ लाख रुपये जमा झाले. दरम्यान तीन आठवड्यात व्यापाऱ्याने सर्व आठ एकरातील खरबूज नेले. शेतातील खरबूजचे पीक व्यापाऱ्याने नेले असता शिवाजी काकडे यांनी उर्वरित सात लाख रुपयासाठी व्यापाऱ्याला वेळोवेळी मोबाईलवर संपर्क करून विचारणा केली असता गुप्ता पुत्राने उडवा उडवीची उत्तरे दिली. व्यापाऱ्याने खरबूज पिकाचे माल नेऊन शिवाजी काकडे या शेतकऱ्याचा विश्वासघात केला असून सात लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
उधारीवर शेतमाल उभारले, वाटेकरी असून शेतावर आर्थिक गुंतणूक केली असल्याने या शेतकऱ्यावर फार मोठे आर्थिक संकट आले असून हतबल झालेला आहे त्यामुळे पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा अशी विनंती शिवाजी काकडे आणि स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.