बिलोली प्रतिनिधी- साईनाथ गुडमलवार:
बिलोली तालुक्यातील कासराळी येथे श्री हनुमान मंदिर शिखर बांधकाम व मंदिर सुशोभीकरण करणे संदर्भात नियोजनाची बैठक दिनांक.20/05/23 रोजी हनुमान मंदीरात पार पडली या बैठकीमध्ये शिखर बांधकाम करणे व सुशोभीकरण संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच सर्वानुमते एकरी पाचशे रुपये पट्टी घेण्याचे ठरले, प्रमुख व्यक्तींची कमिटी तयार करण्यात आले व वार्ड प्रमाणे पाच-सहा व्यक्तींचे नेमणूक करण्यात आले. तसेच श्री.शेषराव महाराज हिप्परगेकर यांनी मंदीर व परिसराची पाहणी करून काही सुचना सांगितले या संदर्भात सर्वांन सोबत चर्चा करून बदल करण्याचे ठरले.
बैठकीसाठी उपस्थित जि.प.सदस्य मा.लक्ष्मण ठक्करवाड साहेब,गंगाराम चरकुलवार पोलीस पाटील,राजेश्वर सावकार लोकमनवार,राजेश्वर सावकार उपलंचवार, संजु सावकार उपलंचवार,भागवत सावकार लोकमनवार,हनमंत इजुलकंठे, शेषराव गजोड ग्रा.पं.सदस्य,विठ्ठल पा.शिंदे,सुभाष पा.शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष, बसवंत पा.कासराळीकर उपसंरपंच प्रतिनिधी,माधव दंतापल्ले शाखाध्यक्ष, शंकर गुंगलवार ,रमेश सबेनवाड,राम इजुलकंठे,नृसिंग मुनलोड,गंगाधर पाटील,अशोक पाटील,शिवानंद पा.सोमासे मा.सरपंच, शिवशंकर पाटील ग्रा.प.सदस्य,राजु पा सोमासे,विजय पाटील,संभाजी टोम्पे ग्रा.पं.सदस्य प्र,शिवाजी पाटील सोमासे,शंकर शिगोंड,शिवाजी हुळगे, राम उमरीकर, नितिन पाटील,राजु पवार,चंदर बोडके, मोहन इंगळे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी,ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
कासराळी येथे श्री.हनुमान मंदीर शिखर बांधकाम व मंदिर सुशोभीकरण संदर्भात नियोजनाची बैठक पार पडली

0Share
Leave a reply