अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस :वर्ल्ड कॉन्श्टुश्युशन अँड पार्लमेंट असोसिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ WCPA यांच्या वतीने श्रीरामपूर येथील शासकीय व्हिआयपी गेस्ट हाऊस मध्ये संपन्न झाला,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व माजी पोलीस अधिकारी श्री सुभाष सोनवणे साहेब होते, तसेच यावेळी श्री सुनील पाटील, श्री रणजीत श्रीगो ड, श्री निवृत्ती बागुल, श्री दिपक म्हस्के, जयश्री सोनवणे, श्री सिताराम नरके,जगदिप वनशिव , श्री सुरेश कांबळे,व आदि मान्यवर उपस्थित होते,या कार्यक्रमाची सुरुवात जागतिक पर्यावरण, तुळशीच्या रोपाला पाणी घालून केले, तसेच यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाप या विषयावर काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्रातुन साहित्यिक व पत्रकार व विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवरांचा , सत्कार करण्यात आला,हा कार्यक्रम खूप छान प्रकारे पडला,या कार्यक्रमाचे आयोजन वर्ल्ड पार्लमेंट महाराष्ट्रचे चॅप्टरचे अध्यक्ष डॉ श्री द्त्ता विघावे साहेब व संघाचे सहकारी यांनी केले, यामध्ये वजीर शेख यांना पत्रकारिता व सोशल वर्क बदल वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवार्ड 2023,चा पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले, पाथर्डीचे साहित्यिक श्री बाळासाहेब कोठुळे यांना हि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हि पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले, तसेच, या कार्यक्रमातचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व पुरस्कार विजेते,, साहित्यिक यांना एका विशेष सिंहासनावर बसवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले,,या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनंत द्रविड,जगदिप वनशिव यांनी केले तर वर्ल्ड पार्लमेंटचे महाराष्ट्राचे चॅप्टरचे महासचिव ऋषिकेश विघावे यांनी आभार मानले.
Leave a reply