Disha Shakti

Uncategorizedसामाजिक

अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन

Spread the love

राहुरी प्रतिनिधी  / प्रमोद डफळ: राहुरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना कळविन्यात येते की जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुका व नगर तालुक्यासाठी शुक्रवार दिनांक 26/05/2023 रोजी सकाळी 9  ते 12 या वेळेत विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. तरी राहुरी व नगर तालुक्यातील ज्या दिव्यांग बांधवांनी आज पर्यंत ऑनलाईन प्रमाणपत्र काढले नाही किंवा युनिक आयडी कार्ड मिळाले नाही त्यांनी उपस्थित राहून आपली तपासणी करून प्रमाणपत्र काढता येणार आहे. प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की आपल्या गावातील किंवा शेजारच्या गावात जो कोणी दिव्यांग असेल त्यांनी आत्तापर्यंत प्रमाणपत्र काढले नाही त्याच्या पर्यत माहीती देणे गरजेचं आहे.

अजून काही ग्रामीण भागात बऱ्याच दिव्यांगाने प्रमाणपत्र काढले नाही म्हणून शासनाच्या योजनेपासुन वंचित आहे.तसेच ज्या दिव्यांगानी आतापर्यत युनिक कार्ड काढले नाही त्यांनी येण्यापुर्वी युनिक कार्ड साठी नोंदणी करून नोंदणी केल्याची पावती, आधार कार्ड झेराॅक्स, रेशन कार्ड झेराॅक्स, दोन पासपोर्ट फोटो, सोबत आणावेत. असे आवाहन दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी व अहमदनगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटने चे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे साहेब,उत्तर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा सचिव हमीद शेख जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख तालुकाध्यक्ष योगेश लबडे यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!