Disha Shakti

राजकीय

सोनई करजगाव व इतर 16 गाव पाणीपुरवठा योजना त्वरित चालू करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा सुरेशराव लांबे यांचा ईशारा

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / युनूस शेख : धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीप्रमाणे धरणात पाणीसाठा १३ ते १४ टीएमसी शिल्लक असतानाही आईन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दिनांक-17 मे रोजी-मिरी तिसगाव व इतर 22 गावे पाणीपुरवठा योजना,बुऱ्हानगर व इतर 44 गावे पाणीपुरवठा योजना, वांबोरी ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना, सोनई करजगाव व इतर 16 गावे पाणीपुरवठा योजना,विद्युत महावितरण कंपनीने या चार पाणी पुरवठा योजना विज बिल थकबाकीच्या नावाखाली विद्युत महावितरण कंपनीने विज पुरवठा खंडित करून बंद करण्यात आल्या आहेत मात्र तीन योजना दोन दिवसानंतर काही पुढा-यांच्या सांगन्यावरुन चालू करण्यात आल्या मात्र सोनई करजगाव व इतर सोळा गाव पाणीपुरवठा योजना सात दिवसापासून बंद आहे.

पिन्याच्या पान्यात तरी राजकारण करु नका जनता तुम्हाला कधी घरी बसवेल ते सांगताही येणार नाही,तेव्हा ही सोनई करजगाव पाणीपुरवठा योजना इतर योजनेप्रमाणे त्वरित चालू करा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर मनमाड रोड रस्ता रोको करून आंदोलन छेडले जाईल असा इशारा तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला आहॆ.

पुढे बोलताना लांबे यांनी वस्तुस्थिती मांडताना सांगितले की या सर्व योजना बंद पाडण्यामंध्ये व चालू करण्यामध्ये हे प्रस्थापित सत्ताधारी व विरोधक पुढारी संगणमताने जनतेला वेठीस धरतात व श्रेय वादात सत्ताधार्यासह विरोधक जाणून बुजून दुर्लक्ष करतात सत्तेत असताना दुर्लक्ष करतात आणि विरोधात असताना ढोंगी आंदोलन करून जनतेची दिशाभुल करुण सहानभूती मिळवतात अशा ढोंगी पुढा-यांना येणाऱ्या काळात जनता धडा शिकवल्या शिवाय रहाणार नाही,

मुळा धरण होण्यासाठी 51 वर्षापूर्वी अनेक गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबांनी आपले घरदार गाव सोडले मात्र त्यांना या धरणाचे पाणी 45 वर्षानंतर प्रकल्पग्रस्त शेतकरी व इतर नागरिकांना पिण्यास मिळाले हे आपले मोठे दुर्दैव आहे या सर्व गोष्टीला हे प्रस्थापित सत्ताधारी जबाबदार आहेत मुळा धरणाच्या पाण्याचा उपभोग कार्यक्षेत्राच्या बाहेरील लोक घेतात परंतु अनेक वर्षानंतर कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी शासनाने जनतेचे कोट्यावधी रुपये खर्च करून योजना राबवली व ती योजना विद्युत महावितरण कंपनीच्या खाजगी सावकारी पद्धतीप्रमाणे अवास्तव वीज बिल लावून येणारे चुकीचे विज बिलामुळे मोठ्या थकबाकीच्या नावाखाली अनेक वेळा या योजना बंद करण्यात येतात,

यापूर्वीही आम्ही प्रहारच्या वतीने शासनाला या सर्व पाणीपुरवठा करणाऱ्या प्रादेशिक योजनांना मीटर पद्धतीने विज बिल न आकारता एचपी प्रमाणे विज बिल आकारणी करावी व या अत्यावश्यक पाणी योजना आशा फालतु कारणाने जास्त वेळ बंद करू नये त्यामुळे कार्यक्षेत्रातील नागरिकांची व लहान मुलांचे,मुक्या जनावरांचे आरोग्य धोक्यात येते याचा शासनाने प्रशासनाने चांगला विचार करावा व विज बिल आकारणी मंध्ये बदल करावा व बंद असलेली सोनई करजगाव व ईतर 16 गावे पाणी पुरवठा प्रादेशिक योजना ईतर योजणे प्रमाणे त्वरीत चालु करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष सत्तेत सहभागी असला तरीही सर्व सामान्य नागरिकांच्या हितासाठी कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन छेडले जाईल त्याची सर्वस्वी जबाबाबदारी शासन व प्रशासन यांच्यावर राहील असा इशारा प्रहार चे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला आहॆ.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!