श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे : श्रीरामपूर शहर व परिसरात मुलींवर अत्याचार मुलींचे विनयभंग असे प्रकार मागे घडले होते. आता मात्र अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला असून एका 14 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यावर दुसऱ्या 14 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यानी घरात घुसून त्याच्यावर नैसर्गिक लैंगिक अत्याचार केला.
याप्रकरणी सदर विद्यार्थ्याने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून वार्ड नंबर 1 नेहरूनगर परिसरातील एका अल्पवयीन आरोपीवर भादवि कलम 377, 506 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 3, 4, 11, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सपोनि बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली.
पीडित मुलावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत पीडित विद्यार्थ्याने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल दुपारी तीनच्या सुमारास त्याच्या बरोबर विद्यार्थी असलेला 14 वर्षाचा आरोपी आला त्याने पीडित विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. यावेळी पीडित अल्पवयीन विद्यार्थी रडायला लागला तेव्हा आरोपी विद्यार्थ्याने पीडित विद्यार्थ्याला तू जर कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्याला संपवून टाकीन अशी धमकी दिली घाबरलेल्या मुलानी घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला घरच्यांच्या मदतीने विद्यार्थ्याने पोलिसात फिर्याद दिली.
अल्पवयीन आरोपी विद्यार्थी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दोघे एकाच वर्गात असल्याचे समजते पालक वर्गात या घटनेने खळबळ उडाली असून मुले सुद्धा मुलांपासून सुरक्षित नसल्याचे या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे पालकांसह पोलिसांनाही या घटनेने गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. मुलींची छेडछाड विद्यार्थिनींची छेडछाड असे प्रकार व्हायचे मात्र आता विद्यार्थ्यावरच विद्यार्थ्यानी लैंगिक अत्याचार करण्याचा हा धक्कादायक प्रकार भरदिवसा श्रीरामपुरात घडला.