Disha Shakti

Uncategorized

चणेगावच्या आशासेवीका प्रमिला शेळके यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जीवन गौरव २०२३ ” चा पुरस्कार जाहीर

Spread the love

विशेष प्रतिनिधी / रमेश खेमनर : संगमनेर तालुक्यातील चणेगाव या गावातील रहिवासी तथा आशासेविका सौ.प्रमिला बाळासाहेब शेळके या चणेगाव येथे पंधरा वर्षापासून आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावत आहॆ त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची ” पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जीवन गौरव पुरस्कार २०२३ ” करीता निवड झाली आहॆ. तसे निवड पत्र सौ.प्रमिला बाळासाहेब शेळके (चणेगाव) यांना यशवंत सेना अहमदनगर ( अहिल्या नगर) व जय मल्हार शैक्षणीक व बहुउद्देशीय सामाजीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहॆ.

१० जून २०२३ रोजी सावेडी,झोपडी कॅन्टीन, माऊली संकुल अहमदनगर या ठिकाणीं सौ.प्रमिला बाळासाहेब शेळके यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जीवन गौरव पुरस्कार २०२३ सन्मानाने मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे. असे पत्र अध्यक्ष कांतीलाल जाडकर यांनी दिले.

याव्यतिरिक्त सामाजिक, राजकीय, पत्रकारीता, व इतर क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार सन्मान होऊन सोहळा होणार आहॆ कुणाला पुरस्कार हवा असल्यास त्या प्रतिनिधींनी कांतीलाल जाडकर अथवा रमेश खेमनर यांना संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहॆ.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!