Disha Shakti

राजकीय

लोहगांव सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी संभाजी पाटील बुड्डे तर व्हाईस चेअरमन पदी प्रकाश पाटील वानोळे यांची बिनविरोध निवड

Spread the love

बिलोली प्रतिनीधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी लि.लोहगाव ता.बिलोली येथील मागील झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपलं परिवर्तन पॅनलचे प्रमुख शंकरराव तोटावाड रेड्डी व संभाजी पाटील बुड्डे यांच्या नेतृत्त्वाखाली 13 पैकी 13 संचालक निवडून आले होते. आज दि.24/05/23 रोजी निर्वाचन अधिकारी देशपांडे साहेब, सचिव शेख सर यांच्या उपस्थितीत चेअरमन पदी संभाजी पाटील बुड्डे तर व्हाईस चेअरमन पदी प्रकाश पाटील वानोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी लक्ष्मण ठक्करवाड मा.जि.प.सदस्य तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस यांनी उपस्थित राहून चेअरमन व व्हाईस चेअरमन,संचालक यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळी आबाराव संगनोड जि.सरचिटणीस ओबीसी मोर्चा, राजेंद्र तोटावाड रेड्डी, शंकरराव तोटावाड,गणपत उमरे, बळीराम पा.मुकदम, नारायण मोरे, दत्ता मुरशेटवाड ग्रा.प.सदस्य,बहिणाजी वरवटे, भाऊसाहेब बनबरे, संचालक अरूण चौधरी, अप्पाराव मुस्तापुरे, बालाजी देशमुख, बालाजी शेटकर, भगवान कानोले, विठ्ठल मुरशेटवाड, व्यकटराव मोरे, शंकर यरमवार, विठ्ठल गायकवाड, सुनिता मुरशेटवाड, अनुसया डुबूकवाड, गजानन बुड्डे पाटील, दिपक तोटावाड, कैलास लघुळे, सदाशिव कांबळे, संचालक आदी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!