Disha Shakti

Uncategorized

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीस महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थीत राहण्याचे धनगर दादा संस्थेचे आवाहन

Spread the love

नांदगाव प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे : सर्व समाज माध्यमांद्वारे, प्रसिद्धी माध्यमाद्वारे सर्व समाज बांधवांना कळविण्यात येते की नांदगाव तालुक्यातील (चौफुली फाटा) अहिल्यादेवी नगर, वाखारी येथे धनगर दादा सेवा संस्था (महाराष्ट्र राज्य) समस्त ग्रामस्थ अहिल्यादेवी नगर, वाखारी. आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती सोहळा.

31 मे 2023 रोजी चौफुली फाटा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान तालुक्यातील गुणवंत ,प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. तालुक्यातील पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील सर्व पत्रकार, प्रशासकीय सेवेतील समाजसेवक, महिला सामाजिक कार्यकर्त्या, इतर क्षेत्रातील मान्यवरांना, सर्व समाज बांधवांना आपण आमंत्रित करत आहोत.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवन कार्य विशद करण्यासाठी जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे.यासाठी व्याख्यात्यांना आपण आमंत्रित करत आहोत. धनगर समाजाचे युवा व्याख्याते निलेश भाऊ टकले ( नांदेड) व रवींद्र भाऊ सुरशे यांचे जाहीर व्याख्यान पाच ते सात या वेळेत आयोजित केले आहे. सर्वांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा.

व्याख्यान संपल्यानंतर सात वाजेपासून पुढे भव्य मिरवणुक सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, सर्व समाज बांधवांनी जयंती सोहळ्यात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आव्हान धनगर दादा बहुउद्देशी सेवा संस्था (महाराष्ट्र राज्य) समस्त ग्रामस्थ अहिल्यादेवी नगर वाखारी यांच्या वतीने करण्यात आले आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!