इंदापूर प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज भिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे या कॉलेजचा एच एस सी बोर्ड परीक्षा 2023 यावर्षीच्या निकालाची परंपरा कायम राखत कॉलेजचा निकाल ९९.४२ टक्के लागला असून यामध्ये एकूण विद्यार्थी 173 परीक्षेत बसले होते त्यापैकी 172 पास झाले असून खालील प्रथम पाच विद्यार्थी प्रथम सुतार वैष्णवी चंद्रकांत 78.67%, दुसरा पाटील साक्षी विष्णू 78.50%, तिसरा जोशी शर्वरी शशिकांत 76.83%, चौथा करचे कांचन हनुमंत 76.33%, पाचवा थोरात ज्ञानेश्वरी विजय 73.17%, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व इयत्ता बारावीची समकक्षता देण्यासंदर्भात शासन निर्णय कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने विठ्ठलराव थोरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिगवण मधील विद्यार्थी बारावी समक्षेतेसाठी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी मार्च 2023 परीक्षा अर्थात इयत्ता १२वी च्या परीक्षेला बसलेले होते १२वी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला आहे यात आमच्या संस्थेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
प्रथम क्रमांक विजय शेगर, दुसरा क्रमांक प्रमोद जाचक, तिसरा क्रमांक विकास तांबे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री बापूराव थोरात उपाध्यक्ष श्री मारुतीराव थोरात सचिव श्री विजय भैय्या थोरात खजिनदार श्री संतोष थोरात संस्थेच्या सदस्य सौ संगीता थोरात श्री नंदराज थोरात श्री अजय थोरात व प्राचार्य सौ वंदना थोरात I T I चे प्राचार्य कृष्णा मोहिते व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Leave a reply