देगलूर प्रतिनिधी / ज्ञानोबा सुरनर : देगलूर येथे राष्ट्रीय पत्रकार संघ भारत पत्रकार संघाचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष संदीप भालेराव यांच्या अध्यक्षखाली व राज्य कार्यकारणी अविनाश देशपांडे हसनाळकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, प्रा. उत्तम कुमार कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 18 मे 2023 रोजी नियुक्त केलेले सर्व पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. पत्रकार संघटना विविध ग्रुपमध्ये विभागलेली असले तरी देश पातळीवर राष्ट्रीय पत्रकार संघ भारत या संघटनेने आपले पायेमुळे मजबूत करीत ग्रामीण भागातील पत्रकारांना मार्गदर्शन व बळ देण्यासाठी ही संघटना सरसावली आहे. त्या अनुषंगाने देगलूर शहराजवळील अशोका पॅलेस मध्ये गुरुवारी सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस प्रदेश अध्यक्ष संदीप भालेराव यांच्यासह संघटनेचे सल्लागार अविनाश देसाई हसनाळकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, एसबीआय बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी वैजनाथ स्वामी, पत्रकार ऋषिकेश बनसोडे, इरशाद पटेल, संजय हळदे, दिलीप जोशी, एन जी सूर्यवंशी आधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला विशेष म्हणजे या संघटनेच्या कायदेशीर सल्लागार पदी जिल्हा पातळीवर अँड . राहुल कुलकर्णी व देगलूर तालुका पातळीवरील अँड. एन जी सूर्यवंशी यांची कायदेविषयक सल्लागार म्हणून नियुक्ती करून नियुक्ती पत्र देण्यात आले. तर संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्षपदी ऋषिकेश बनसोडे तर मराठवाडा सचिवपदी श्याम वददेवार यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा कार्यकारणी मध्ये जिल्हाध्यक्षपदी संजय हळदे, जिल्हा उपाध्यक्षपदी शशिकांत पटणे, जिल्हा सचिव पदी इर्शाद पटेल, जिल्हा कोषाध्यक्ष दिलीप जोशी, जिल्हा संघटक पदी प्रकाश गवलवाड, जिल्हा सदस्य पदी अनिल पवार, मारुती कुडकेवार यांची जिल्हा पातळीवरील नियुक्ती करण्यात आली आहे. तर तालुका अध्यक्षपदी योगेश जाकरे, तालुका संघटक पदी सुभाष वाघमारे, तालुका सदस्य पदी शहाजी वरखिंडे, ज्ञानोबा सुरनर, सुनील पोलावर, अमोल कुमार शिंदे, शिवकुमार बिरादार, अझीम अन्सारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील बैठकीस राष्ट्रीय भारत पत्रकार संघाचे अनेक पत्रकार व पत्रकार संघ संचलित विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या पत्रकार संघटनेला व्यापक असे रूप यावे राष्ट्रीय पत्रकार संघ भारत या संघटनेच्या माध्यमातून पत्रकाराच्या समस्या दूर झाल्या पाहिजेत पत्रकारांनी प्रामाणिक पत्रकारिता करावी. पत्रकारितेकडे व्यावसायिक स्वरूपाचे माध्यम म्हणून न पाहता छंद व समाजाच्या हितासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून पत्रकारिता करावी पत्रकार संघ वाढीसाठी आपली या पुढील दिशा कशी असेल यावर अनेकांनी सविस्तर मनोगत व्यक्त केले. नियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
देगलूर येथील अशोक पॅलेस येथे राष्ट्रीय पत्रकार संघ भारत प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

0Share
Leave a reply