अहमदनगर / रमेश खेमनर : जगातील सर्वात मोठी आणि समृद्ध लोकशाही असलेल्या भारतात राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. सर्वोच्च पदावरील व्यक्तीने नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले पाहिजे, ही सर्वसामान्य देशवासियांची रास्त भावना आहे. मात्र असे होताना दिसत नाही याचे संपूर्ण देशाला वाईट वाटत आहे, असे खडे बोल माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपला सुनावले.
संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. नवी दिल्ली येथे बांधलेल्या नवीन सेंट्रल व्हिस्टा या संसद इमारतीच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान आहे. जगातील सर्वात मोठी आणि समृद्ध लोकशाही असलेल्या भारतात राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. या पदावर द्रौपदीजी मुर्म या आदिवासी समाजातील आहेत. उद्घाटनाचा अधिकार हा राष्ट्रपती महोदयांचाच आहे. मात्र असे होताना दिसत नाही हे संपूर्ण देशाला वाईट वाटणारे आहे.
आदिवासी, मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना संधी न देणे हा राज्यघटनेचा अपमान आहे. समृद्ध लोकशाही असलेल्या या देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने नवीन संसद भवनाच्या उद्घाटन केले पाहिजे. ही सर्वसामान्य देशवासियांची रास्त भावना आहे. मात्र असे होताना दिसत नाही याचे संपूर्ण देशाला वाईट वाटत आहे, असेही थोरात म्हणाले.संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधी पक्षांचा बहिष्कार नव्या संसदेच्या आखणीपासून सुरू झालेला वाद आता उद्घाटनापर्यंत कायम राहिला आहे. नवीन संसद भवनाच्या येत्या रविवारी होणाऱ्या उद्घाटन समारंभावर काँग्रेस, द्रमुक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, तृणमूल काँग्रेस व आपसह १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा बुधवारी केली. या सर्व पक्षांनी संयुक्त निवेदन जारी करून याबाबत घोषणा केली.‘राष्ट्रपतींना या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण नाही. लोकशाहीचा आत्माच संसदेतून हद्दपार करण्यात आल्याने नव्या इमारतीच्या उद्घाटनाला जाणे निरर्थक आहे,’ असे विरोधकांनी या निवेदनात म्हटले आहे. निरंकुश, लोकशाहीविरोधी, राज्यघटना विरोधी, अशोभनीय कृत्य करणारे असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख यात करण्यात आला आहे.
राष्ट्रपतींना डावलताना पाहताना देशाला अत्यंत वाईट वाटतंय, संयमी थोरातांचे भाजपला खडे बोल

0Share
Leave a reply