Disha Shakti

राजकीय

शेतक-यांना दिवसा विज द्या व जळालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित द्या अन्यथा 5 जुन ला आंदोलन- सुरेशराव लांबे

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी  / शेख युनूसनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे विद्युत महावितरणाने दुर्लक्ष केल्यास व शेतकऱ्यांना दिवसा बारा तास विद्युत पुरावा करावा व नादुरुस्त ट्रांसफार्मर कुठलीही वसुली न करता त्वरित देण्यात यावे, अन्यथा 5 जून रोजी विद्युत वाहकतार पकडून आंदोलन करण्याचे निवेदन नगर जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व तालुका अध्यक्षांना बरोबर घेऊन जिल्हाध्यक्ष श्री विनोद सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विदुत महावितरण अधिक्षक अभीयंता श्री.प्रकाश खांडेकर साहेब यांना देन्यात आले असल्याची माहीती प्रहार जनशक्तीपक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिली.

महावितरण अधिक्षक अभियंता श्री प्रकाश खांडेकर साहेब यांच्याशी चर्चा करताना प्रहारचे जिल्यातील प्रमुख कार्यकर्ते 👇👇

पुढे बोलताना लांबे यांनी सांगीतले ऋतुमानात होणाऱ्या बदलांमुळे शेतकरी वर्ग 4 वर्षापासुन भयानक अडचणीत आला असुन रात्रीच्यावेळी विषारी साप व वाघ व ईतर जंगली प्राणी यांच्या हल्यामुळे अनेक शेतक-यांना आपला प्राण गमवावा लागल्याने त्या कुटुबांवर अतिशय मोठे संकट आलेले आहे ते संकट ईतरांनवर येऊनये त्यासाठी शेतक-यांच्या शेतीपंपाला दिवसा १२ तास वीज देण्यात यावी जेणेकरून अशी दुर्दैवी वेळ कुठल्याच शेतक-यांनवर येऊ नये,व तसेच महावितरण यंत्राने मार्फत नादुरुस्त झालेले ट्रान्सफार्मर दुरुस्ती करण्यास अधिका-यांनकडुन अनेकवेळा टाळाटाळ केले जाते व ट्रान्सफॉर्मर मेंटेनेस कडे ही दुर्लक्ष केले जाते त्या सर्व अधिका-यांनी 48 तासाच्या आता महावितरणच्या यंत्रणेने हे संबंधित नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त करणे हे बंधनकारक आहे.

परंतु महावितरणची यंत्रणा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी विद्युतवाहक तारा तसेच पोलची रेलचेल झाली आहे ते सर्व पोल व तारा शेतक-यांनकडुन कुठलेही अभिलाशा न करता त्वरीत स्टेट करुन द्यावेत,तरी निवेदनातील सर्व विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,व संपुर्ण नगर जिल्यातील सर्व तालुक्यातील महावितर कार्यक्षेत्रातील आमच्या मागन्या पुर्ण न केल्यास आम्हाला प्रहार स्टाईलने येत्या सोमवार दिनांक ५ जून रोजी अहमदनगर येथील महावितरण कार्यालयाच्या समोर सर्व शेतक-यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन छेडू या आंदोलनादरम्यान चालू विद्युत वाहक तारेला पकडून आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी दिला आहे. सदर मागणीचे निवेदन आज महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटक तुकाराम शिंगटे, जिल्हा समन्वयक विजय भंडारे, राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील, नगरचे तालुकाध्यक्ष भगवान भोगडे ,राहुरी युवा अध्यक्ष ऋषिकेश ईरुळे, कर्जत तालुकाध्यक्ष सुदाम निकत, शेवगाव तालुका अध्यक्ष रामभाऊ शिदौरे, जामखेड तालुका अध्यक्ष जयसिंग उगले, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर, पाथर्डी तालुका अध्यक्ष मुकुंद आंधळे, नानासाहेब पारधे , प्रवीण पिंपळे, ताहाराबाद येथील शेतकरी राजेद्र ठुबे, पवार नाना मिस्तरी,तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे आदी मान्यवर कारे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अशी माहिती राहुरीचे तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!