Disha Shakti

Uncategorized

म्हैसगाव येथील डॉ. सुभाष काकडे ज्युनियर कॉलेजचा शंभर टक्के निकाल

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी/शेख युनूस: राहूरी तालुक्यात असलेल्या दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या म्हैसगांव येथील प्रसाद फाऊंडेशन संचलीत डॉ. सुभाष काकडे ज्युनिअर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी 2022 ते 2023 परीक्षेचा निकाल जाहीर होऊन शंभर टक्के निकाल मिळवत घनघनीत यश संपादन केले.

डॉ. सुभाष काकडे पाटील महाविद्यालय येथील आर्ट्स, कॉमर्स, आणि सायन्स या तिन्ही शाखेचा निकाल हा 100% लागला असून तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात या महाविद्यालयाचे नांव गाजत असून संपूर्ण उत्तीर्ण विद्यार्थाचे अभिनंदन व कौतुक होत आहे. 2018 ते 2023 सलग सहा वर्षांपासून बारावी शाखेचा निकाल आर्ट्स, कॉमर्स, आणि सायन्स या शाखेचा निकाल 100% लावत डॉ. सुभाष काकडे महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवत या वर्षीही 100% निकाल हाती घेत गगनभरारी मारली आहे.

शेरी चिखलठाण येथील लोकप्रिय लोकनियुक्त डॉ. सुभाष बन्सी काकडे पाटील यांनी सन 2016 मध्ये म्हैसगांव येथे कनिष्ठ महाविद्यालय स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणा पासून वंचित न ठेवता यशाचा मार्ग सुरळीत करून दिला.म्हैसगांव पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांना 10 वी शिक्षणानंतर अकरावी, बारावी शिक्षणासाठी सुख सुविधा, प्रवास मार्ग सुरळीत नसल्याने शिक्षणा पासून वंचित राहत असल्याचे डॉ. सुभाष काकडे यांच्या निर्दर्शनात येताच त्यांनी प्रसाद फौंडेशन संचलीत डॉ. सुभाष काकडे नावाची शिक्षण संस्था उभी करत बहुजन समाजातील, गोर गरीब, विद्यार्थी यांना शिक्षण मिळावे म्हणून धडपड सुरु करत डॉ. सुभाष काकडे महाविद्यालय सुरु करून आज यशाच्या शिकरावर पोहचवले आहे.

डॉ. सुभाष काकडे महाविद्यालय हे श्री. केदारेश्वर मंदिराच्या पावन भूमीत असून दर्जेदार भौतिक सुविधा, निसर्गरम्य परिसर, सोईसुविधा, परिपूर्ण शिक्षण हे सलग सहा वर्षांपासून कार्यरत असणारे शिक्षक उपलब्ध असल्याने त्यांच्या कौसल्यामुळेच सलग सहा वर्षे डॉ. सुभाष काकडे महाविद्यालय निकालाची परंपरा कायम राहिली आहे.

कला शाखेत भालेराव ख़ुशी शिवाजी…77.67% मिळवून प्रथम,घनदाट मंगेश..76.50% द्वितीय, गागरे निखिल 70%, तर सायन्स शाखेत कोरडे स्नेहल 77.83%,प्रथम क्रमांक,जाधव शीतल 77.50% मिळवत द्वितीय, साकुरे कृष्णकांत 77%, तृतीय क्रमांक मिळवला आहे.
कॉमर्स शाखेत माने निकिता 78.83% मिळवत प्रथम क्रमांक, चव्हाण निकिता 78.17 %, द्वितीय क्रमांक, गांडाळ निकिता 77.17% तृतीय क्रमांक मिळविला आहे.

डॉ. सुभाष काकडे महाविद्यालय बारावीतील यशस्वी व गुणवंत विद्यार्थी यांना संस्थेचे अध्यक्ष व लोकनियुक्त सरपंच डॉ. सुभाष बन्सी काकडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राचार्य माने एस एस, प्रा. चोपडे एस बी,प्रा. गाडे एम बी, प्रा. दिघे डी. पि, प्रा. काकडे जी. जी.,प्रा.गागरे आर बी, प्राध्यापिका रोकडे के बी,नलगे एल डी,आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!