दौंड प्रतिनिधी / किरण थोरात : दौंड कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी घटक पक्ष काँग्रेसला सोबत घेवून लढविली असती तर चित्र वेगळे दिसले असते. दौंड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले आघाडीच्या मित्रपक्षांना एकत्र घेतले नाही अथवा त्यांचा विचार देखील केला नाही त्यामुळे
भाजपाला विजय सोपा झाला राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरात यांनी दौंड तालुक्यातील एकाही काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याला तसेच आघाडीच्या इतर शिवसेना या घटक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना कोणतीही विचारपूस केली नाही. केवळ राष्ट्रवादी हा एकमेव ताकतीचा पक्ष गृहित धरुन आत्मविश्वासाने निवडणूक लढविली परंतु काठावर विजय संपादन करता आला. या निवडणूकीत नाराज काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) या घटक पक्षातील उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढविली त्याचा परिणाम राष्ट्रवादीचे तुल्यबळ उमेदवारांना
बोटावर मोजण्या इतक्या फरकाने पराजय पत्करावा लागला.
या निवडणूकीत नाराज शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी घटक पक्षाच्या वागणूकीला कंटाळून महेश पासलकर यांनी घट ाच्या वागणूकीला कंटाळून शिवसेना (ठकारे गट) पक्षाला राम राम ठोका व शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते शहर व तालुका यांच्या मी पणामुळे घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना डिवचण्याचे काम करतात.
स्वत:च्या गावात आमदारकीला मताधिक्य देता येत नाही पण स्वप्न मात्र आमदारकीचे व जिल्हा परिषद सदस्याचे बघतात. सलग दोन वेळा विधानसभेला त्यांच्या पक्षाचा उमेदवार त्यांना निवडून आणता आला नाही आणि स्वत:ला राष्ट्रवादीचे कट्टर म्हणून तालुक्यात टेंभा मिरवतात.पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप व भोर- वेल्हा-मुळशीचे आमदार
संग्राम थोपटे यांनी आघाडीसाठी विशेष प्रयत्न केले परंतु त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी अस्तीत्वात असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत घटक पक्षांना राष्ट्रवादीकडून डावलले जाते स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जात नाही त्यामुळे या पुढील काळात होणाऱ्या सर्वच निवडणूकीमध्ये घटक पक्ष काँग्रेस पक्षाला विचारात न घेतल्यास जशी परिस्थिती असेल तसा त्यावे निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल.
स्वबळावर अथवा स्थानिक पातळीवर इतर पक्षांशी एकजुट करुन या पुढील निवडणूका लढवू असे कार्यकर्ते बोलत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वरिष्ठांना स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेवून त्या त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर योग्य ते निर्णय महाविकास आघाडीतील आपल्या सर्व मित्रांना बरोबर घेवून घेण्यात यावा. दौंड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विठ्ठल दोरगे व दौंड शहर काँग्रेस उपाध्यक्ष महेश जगदाळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत न घेण्याची चूक राष्ट्रवादीला पडली महागात दौंड विधानसभा अध्यक्ष विठ्ठल दोरगे यांचा आरोप

0Share
Leave a reply