अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या म्हैसगांव आग्रेवाडी, चिखलठाण येथे भरदिवसा बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यानी लाखोंचा रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला.
सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी दोन ते साडे तीन च्या दरम्यान म्हैसगांव आग्रेवाडी येथील रामदास चिमाजी गुलदगड हे शेती कामासाठी घराच्या दरवाजाला कुलूप लावून शेतात गेले असता चोरट्यानी कपाटातील मोहणमाळ, कानातील झुमके,टापस,नेकलेस, बोरमाळ, अंगठी, कानातील रिंगा, ओम, ताईत, डोरले आणि चांदीचे बाजूबंद असे एकूण 4 लाख 86 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून पोबारा केला.
शेरी चिखलठाण येथील शेतकरी सुकदेव बालाजी काकडे व अनिल सुकदेव काकडे यांच्या घराचे दरवाजाचे कडी, कोयंडे तोडून रोख रक्कम पंधरा हजार रुपये चोरून नेले.
या घटनेची माहिती मिळताच राहूरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे व पोलीस कॉनस्टेबल जानकीराम खेमनर यांनी घटनास्थळी धाव घेत श्वान पथकाला पाचरण केले.
या बाबत आग्रेवाडी येथील रामदास गुलदगड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरोधात गुन्हा रजि नं.571 नुसार कलम 454,380,अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मेघशाम डांगे करीत आहे.यापूर्वी चोरीच्या घटना घडल्या असून चोरांचा तपास लागलेला नसून चोरटे मोकाट फिरतात या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत असून राहूरी पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता चोरट्याचा बंदोबस्त करून जेर बंद करावे आणि परिसरातील भीतीचे वातावरण दूर करावे.
Leave a reply