नांदगाव प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे : नांदगाव तालुक्यातील नाग्या साक्या नदी वरून जाणाऱ्या नांदगाव मालेगाव रस्त्यावरील पुलावरून विको कार क्रमांक- MH-41-BE 1022, दिनांक 29/ 05/2023 रोजी रात्री एक वाजता नांदगाव कडून मालेगाव कडे जात असताना नदी पुलावरून कोसळून भीषण अपघात, अपघातात लहान मुले, महिला, पुरुषांचा समावेश होता.
रात्रीच्या एक वाजेच्या सुमारास अपघात घडल्याने रस्त्याने फारशी वर्दळ नसल्याकारणाने गाडी पुलावरून कोसळली तेव्हा मोठा टायर फुटण्याचा आवाज होऊन हॉर्नचा आवाज ऐकून जवळच हाकेच्या अंतरावर राहणारे सामाजिक कार्यकर्ते किरण भाऊ मोरे यांनी कार्यकर्ता सह घटनास्थळी धाव घेतली अंबुलन्स वाहनाला फोन करून अपघात ग्रस्तांना विको गाडीतून बाहेर काढत ॲम्बुलन्स कार मधून नांदगाव येथे ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करत अपघातग्रस्तांना वाचविण्याचे प्रयत्न प्रयत्न केले.
अपघातीतील सर्व प्रवासी गंभीर जखमी असल्यामुळे, त्यांचे नाव गाव समजू शकले नाही असे किरण भाऊ यांच्याकडून समजले तसेच या अपघातात लहान बालकांसह तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहॆ.
नांदगाव तालुक्यातील नाक्या- साक्या पुलावरून विको कारचा कोसळून भीषण अपघात; अपघातात तिघांचा मृत्यू

0Share
Leave a reply