नांदगाव प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे: सर्व धर्म समभाव , सामाजिक एकात्मता, गोरगरिबांविषयी कळवळा, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बी मोड ,प्रजेविषयी तळमळ अशा प्रकारचे कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे धनगर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांचे पोटी झाला. माणकोजी शिंदे सर्व सामान्य परिस्थितीला असून देखील ते विद्वान व दूरदर्शी गृहस्थ होते अठराव्या शतकामध्ये आजच्यासारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिल्याबाई ची शिक्षणाची घरीच व्यवस्था केली.
अहिल्याबाईंची जीवन घडविण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता अवघ्या आठ वर्षाची असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजश्री मल्हारराव होळकर यांच्या बारा वर्षाचा एक शूरवीर मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी अहिल्याबाई होळकरांचा विवाह 20 मे 1733 रोजी पुण्यातील शनिवारी वाडा येथे झाला.
लग्नानंतर लगेच आपल्या चतुर, क्षमाशील व शांत स्वभावाने कुटुंबातील सर्वांचे मन जिंकून घेतली.त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्य झाली. दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे, वाचणे, गणित इत्यादी गोष्टी शिकविले तसेच घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे, लढाया करने, पत्रव्यवहार करणे, न्याय निवाडा करणे याबाबतचे प्रशिक्षण दिले परिणामी अहिल्याबाईंची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली.
इसवी सन 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत शूरवीर पती खंडेराव होळकर यांना वीर मरण आले, वयाच्या अवघ्या एकूण 29 व्या वर्षी वैधव्य असताना, जुन्या रुढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामीत्वाचा परिचय दिला सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चरित्रावर शिंतोडे हे माहीत असूनही सती जाणे तहकूब करण्यात आहिल्याबाईंनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे. आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही,कोण जाणे परंतु जगलो तर लाखो प्रजाजणांना सुख देता येईल असा विचार करून, अहिल्याबाईंनी प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला.
धर्म रूढी परंपरा या पलीकडे, कर्तव्य महत्वाचे मानून रयतेला कल्याणकारी राज्य दिले.खऱ्या कल्याणकारी योजना काय असू शकतात आणि त्या कशा राबवल्या जाव्यात हे त्यांनी दाखवून दिले. सासरे मल्हार राव यांचा मृत्यू 20 मे 1766 गोमूदगाव मालेगाव यांचा मृत्यू 27 मार्च 1767 मध्ये झाला अशी एका मागून एक दुःख येत असताना अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी, समाधानी आणि संपन्न बनविण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाई धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता व न्याय या तत्त्वांनी राज्य केले.
पेशवे रघुनाथराव यांना होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोभ सुटला. त्यांनी पेशवाईत होळकर यांचे राज्य समाविष्ट करण्यासाठी पन्नास हजाराची फौज घेऊन इंदूरवर चढाई केली. तेजस्विनी अहिल्याबाईंना समजले तेव्हा त्यांनी खचून न जाता रघुनाथ रावांना खलिता पाठविला.
‘”आपण माझे राजे हिरावून घेण्यासाठी कपट रचून आलात, आमच्याकडील फितूरास गाठले.
मला दुबळी समजला की खुळी? दुःखात बुडालेल्यांना अधिक दुःखद बुडवावे हा आपला दृष्ट हेतू? आता आपली गाठ रणांगणात पडेल! माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईल. पण आपण हरला तर आपल्याला तोंड दाखवायला जागा होणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडlल तर बरे. मी अबला आहे असे समजू नका मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल. वेळ पडली तर हत्तीच्या पायाशी साखळीने बांधून तुमचे स्वागत केले नाही तर ,होळकरांची सून म्हणून नाव लावणार नाही.
अहिल्या म्हणजे लखलखती विज तळपती समशेर होत्या. त्यांनी आपले आयुष्य लोक कल्याणकारी कार्यासाठी असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केले संपूर्ण भारतात ठिकठिकाणी विहिरी ,तलाव, कुंड ,घाट बांधले आहेत. रस्ते पूल निर्माण केले आहे जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाते ते काम लोकमाता अहिल्याबाई यांनी केले, उद्योगधंद्यांना व विकासाला प्राधान्य दिले.
आशा लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त धनगर दादा बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित जयंती सोहळा 2023 नांदगाव तालुक्यातील अहिल्यादेवी नगर (चौफुली फाटा) वाखारी येथे 31 मे रोजी साजरा करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष: निवृत्ती शिंदे, संचालक मंडळ, पदाधिकारी व उपस्थित गावचे सरपंच काशिनाथ भाऊ सोनवणे, उपसरपंच संजय भाऊ काकळीज, पोलीस पाटील राकेश भाऊ चव्हाण व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी धनगर दादा बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या नांदगाव तालुक्यातील कृषीवल अकॅडमी संचालक ज्ञानेश्वर बोगीर सर यांच्यासह पोलीस दलात निवड झालेले एस एस गीते, कोकिळा चोळके, प्राजक्ता , कल्याणी देशमुख, विद्या सोनवणे, ऋतुजा काकळीज, या सर्वांचा सन्मान पूर्ण सत्कार करण्यात आला.श्री चिंतामण गोटे, श्री गोविंद शेरमाळे, श्री नाना शेरमाळे, श्री दीपक पवार, श्री देविदास शेरमाळे, श्री शालिग्राम ढोणे प्राध्यापक रवींद्र सुरशे सर यांनी केला.तसेच गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री काशिनाथ भाऊ सोनवणे, उपसरपंच श्री संजय भाऊ काकळीज.पोलीस पाटील श्री राकेश भाऊ चव्हाणचे अरमन श्री गोपीचंद शेरमाळे, वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर, श्री भारत भाऊ केसकर, श्री शेखर दादा, श्री रामदास भाऊ जालगुंडे, श्री गुलाब भाऊ शेरमाळे, श्री प्रवीण भाऊ पवार, श्री समाधान शेरमाळे, श्री गोरख भाऊ पारेकर, राहुल मोरे यांचा देखील सन्मान पूर्ण सत्कार संस्थेचे संचालक श्री शालिग्राम ढोणे, श्री खंडू कोळेकर व सर्व संचालक मंडळाकडून करण्यात आला.
युवा व्याख्याते प्राध्यापक रवींद्र सुरशे सर यांचा देखील सन्मान पूर्ण सत्कार धनगर दादा संस्थेचे संस्थापक श्री निवृत्ती शिंदे यांनी केला.दरम्यान कृषीवल अकॅडमी चे बोगीर सर व विद्यार्थिनी कोकिळा चोळके यांची विद्यार्थ्यांना/ समाजाला प्रोत्साहन पर राजमाता अहिल्याबाई यांचे जीवन कार्याविषयी भाषणे झाली.नंतर प्राध्यापक रवींद्र सुरेश सर यांचे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन कार्य विशद करणारे व्याख्यान झाले.
सूत्रसंचालन संस्थेचे संचालक विनोद भाऊ अहिरे यांनी केले. श्री रामदास भाऊ जालगुंडे, श्री भारत भाऊ केसकर, जाधव साहेब, अख्तर सोनावाला्, श्री अशोक भाऊ पवार, श्री गोकुळ पडूळ, श्री मोठा भाऊ सोनवणे ,श्री साहेबराव कापडणे ,पवन पवार, श्री भारत पडूळ, श्री भाऊराव पारेकर, श्री एकनाथ भाऊ सोनवणे, सचिन, श्री बापू श्रीराम, यांचे सहकार्याबद्दल धन्यवाद
यावेळी श्री बाबूलाल शेरमाळे, श्री आबळू जालगुंडे , श्री आशोक गोटे, श्री दिलीप सोनवणे, श्री चंद्रभान शेरमाळे, श्री आबासाहेब बच्छाव, श्री.निवृत्ती शेरमाळे, श्री शंकर बाबा सरोदे, सौ .मीनाताई काकळीज, सौ.गीताबाई जालगुंडे सौ.विमल बाई पवार ,सौ.वैशाली ताई पवार यांच्या सह सर्व उपस्थित मान्यवरांचे संस्थेच्या वतीने धन्यवाद आभार व्यक्त करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता चौफुली फाटा येथे मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता. परिसरातील सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत मिरवणूक सोहळा संपन्न झाला.