लातूर प्रतिनिधी / सोनाजी भंडे : हरंगुळ खुर्द येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 298 जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त कै.शरद भंडे यांच्या स्मरणार्थ इयत्ता पहिली ते दहावी गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान व सत्कार करण्यात आले. हा सत्कार सोनाजी भंडे सर्वेसर्वा भंडे लॉन्स अँड मंगल कार्यालय यांच्यावतीने करण्यात आला.
यावेळी हरंगुळ खुर्द गावचे उपसरपंच आनंद धोंडीराम पवार, ग्रामसेवक कसबे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्रीकांत भुजबळ, हरंगुळ खुर्द गावचे ज्येष्ठ नागरिक शिवाजी गुरुजी पाटील, ग्यानदेव होळकर, उमाकांत भुजबळ, निळकंठ झूंजे, मुन्ना भुजबळ,आनंद राजुळे,अजित पवार, वैभव पवार, विठ्ठल भंडे, शिवमुर्ती झुंजे, विजयकुमार शिंदे,तसेच हरंगुळ खुर्द येथील आयोजित केलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती समितीचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे उपस्थीत होते. विश्वनाथ होळकर, उमाकांत होळकर, संदिपान होळकर, लक्ष्मण होळकर, सोनाजी भंडे, बाळासाहेब होळकर, बालाजी होळकर, बाळू होळकर, खंडेराव होळकर, महेश होळकर, अंकुश चिगुरे आकाश चिगुरे, श्याम होळकर, सतीश होळकर, आदींनी परिश्रम घेतले. व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पवार यांनी केले.
Leave a reply