राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांचा सेवापुर्ति सोहळा 31मे रोजी संध्याकाळी राहुरी पोलीस स्टेशन येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम , उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, राहुरीचे तहसीलदार चंद्रजित राजपूत, तसेच यावेळी पोलीस निरिक्षक मेघशाम डांगे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थीत होते. यावेळी शिवसेनेचे सह संपर्क प्रमूख रावसाहेब खेवरे, श्रीरामपूर मतदार संघाचे प्रहारचे आप्पासाहेब ढुस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी मोरे, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे, प्रहार पक्षाचे सुरेश लांबे, तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुरसिंगराव पवार, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा यांनी पोलीस निरिक्षक डांगे यांच्या कार्यकाळातील कार्याबद्दलचे अनुभव सांगून कौतुक केले.यावेळी सामाजिक, राजकीय, धार्मिक, उद्योग आदि क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक श्री मेघश्याम डांगे साहेब यांनी राहुरीत केलेल्या कामातून दाखवून दिले असून त्यांनी राहुरीत कायदा सुव्यवस्थेची घडी बसून शांतता व सलोखा राखण्याचे कार्य आपल्या 4 ते 5 महिन्याच्या कालावधीत दाखवून दिले असल्याचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती भोर या म्हणाल्या.यावेळी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके साहेब म्हणाले की राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कामाचा मोठा व्याप आहे.येथे काम करत असताना मोठी कसरत करावी लागते.डांगे साहेब यांनी याठिकाणी कमी कालावधीत कामे करून राहुरी शहरातील नागरिकांचे मने जिंकले.
![]()
यावेळी शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे, तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुरसिंग पवार,साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सामाजिक, राजकीय, धार्मिक, उद्योग अदि क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा,नीरज बोकील, महादेव शिंदे, गोपनीय विभागाचे अशोक शिंदे, रोहकले, पोलीस हे.कॉ. जानकीराम खेमनर, पोलीस हे.कॉ.पारधी, आदिनाथ पाखरे आदिंसह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला व नंतर स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
राहुरीचे पोलिस निरीक्षक मेघशम डांगे यांचा सेवापूर्ती सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

0Share
Leave a reply