अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या दुर्गम डोगराळ भागात युवक तरुणांनी ढोल ताशाच्या तालावर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न करण्यात आली.
बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी चिखलठाण येथे अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त म्हसकोबा वाडी येथून( म्हसकोबा मंदिर )येथून मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. जेष्ठ युवक,तरुणांनी विशेष सहभाग नोंदवला.
अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूक करण्यात आली. मिरवणूकीचा समारोह चिखलठाण येथील हनुमान मंदिर येथे करण्यात आला.अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी यांचा आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या महिलांना वृक्षरोप देऊन सन्मान करण्यात आला.
अहिल्यादेवी होळकर जयंती वेळी रमेश फिरोदिया महाविद्यालय चे प्राध्यापक अस्वले सर यांच्या व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते.
अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त साहेबराव डोलनर यांनी अथक परिश्रम घेतले. सचिन काळनर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार रॉयल पाटील चे अशोकराव डोमाळे यांनी मानले.
यावेळी उपस्थित रॉयल पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकराव डोमाळे,राजाराम काकडे सर,आबासाहेब काळनर, संतोष शेठ काळनर, (भाऊ उद्योग समूह ),सुभाष बाचकर,धीरज टेमकर, विजय डोमाळे, सावित्रा डोमाळे,विनोद काळनर, बंटी काळनर, आदी युवक तरुण कार्येकर्ते उपस्थित होते.
Leave a reply