प्रतिनिधी / रमेश खेमनर : राहुरी तालुक्यातील गोटूंबे आखाडा येथे २ जून रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथमता तरुणांनी राहुरी येथील बिरोबानगर ते गोटूंबे आखाडा पर्यन्त मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्यानंतर गोटूंबे आखाडा येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले व त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी प्रीतम बुधनर व व श्रध्दा शेंडे यांनी व्याख्याने केली. व ज्येष्ठ नेते आण्णासाहेब बाचकर यांनी अहिल्यादेवींचा इतिहास व कार्य उपस्थितांना सांगीतले यानंतर पारंपरिक वाद्याच्या सहाय्याने गावात मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते ठिकठिकाणी गावातील महिलांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तींचे औक्षण करून हार घालण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश बाचकर, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आण्णासाहेब बाचकर, उपसरपंच तुकाराम बाचकर, माजी सरपंच मच्छिंद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शेंडे, वसंत बाचकर, रावसाहेब बाचकर, संजय पिसाळ, आण्णासाहेब पिसाळ, सुरेश महारनोर, दत्तात्रय खेमनर, नीलेश बीडगर, संदिप बाचकर, आण्णासाहेब बाचकर (वायरमण) बापू होडगर, आप्पासाहेब बाचकर, सोपान बाचकर, गंगाराम तमनर, रावसाहेब होडगर सह मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थितीत होते. राहुरी पोलीस स्टेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Leave a reply