Disha Shakti

इतर

मुळा व्हॅली पब्लिक स्कूल आग्रेवाडी म्हैसगांव दहावीचा 100% निकाल

Spread the love

राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी तालुक्यातील आग्रेवाडी येथे प्रबोधन एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन व्दारासंचालित मुळा व्हॅली पब्लिक स्कूल आग्रेवाडी म्हैसगांव या शाळेचा सलग पाच वर्षापासून इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्यात याही वर्षी यशस्वी यश आले आहे सर्व यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक व पालकांची गावाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

यावेळी यशस्वी विद्यार्थी कुणाल दत्तात्रय हारदे या विद्यार्थ्याला  86.20% शाळेमध्ये पहिला नंबर मिळाला. यश रोहिदास पावडे या विद्यार्थ्याला शाळेमध्ये दुसरा नंबर मिळाला. याला 84.20%मिळाले.रोहिदास दत्तात्रय कुटे या विद्यार्थ्याला शाळेमध्ये तिसरा नंबर मिळाला . याला 83.45%मिळाले. श्रद्धा पोपट माने या विद्यार्थिनी शाळेमध्ये चौथा नंबर मिळाला हिला 83.20%, मिळाले. सार्थक अशोक नेहे या विद्यार्थ्याला शाळेमध्ये पाचवा नंबर मिळाला.याला 80.20% मिळाले व तसेच सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशा मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष जी माने सर सचिव माने मॅडम व प्रिन्सिपल विनोदजी म्हसे सर सर्व शिक्षकेतर कर्मचारी पालकांकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले व संस्थेकडून सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली पार पाडण्यास अतिशय परिश्रम घेतल्याबद्दल संस्थेने सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!