दिशा शक्ती न्युज : प्रमोद डफळ, दि. ५, राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि वनस्पती शास्त्र विभागाच्या अखिल भारतीय समन्वयीत वनशेती संशोधन प्रकल्पाच्या वतीने आज़ ५ जून रोजी जागतीक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यावेळी जागतीक पर्यावरणा विषयीचे तसेच वृक्ष लागवडीचे महत्व व त्यापासून मिळणारे फायदे याबाबत उपस्थितांना वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमूख डॉ.विजू अमोलीक व अखिल भारतीय समन्वयीत वनशेती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ.भीमराज नजन यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उपस्थितीत पर्यावरण प्रेमींना वनशेती संशोधन प्रकल्पा तर्फे विविध प्रकारची आवळा, बांबू, निलगिरी, सीताफळ या प्रकारची रोपे वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमूख डॉ.विजू अमोलीक, तर प्रमूख उपस्थिती वनशेती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ.भीमराज नजन, सहाय्यक प्राध्यापक डॉ.रवींद्र कोळसे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री.रवींद्र भिंगारदे, तसेच कृषि वनस्पती शास्त्र विभागातील डॉ.संदीप लांडगे, डॉ विजयकुमार शिंदे, डॉ.विलास आवारी, डॉ.लक्ष्मण तागड, कृषि सहाय्यक संजय बोरुडे, गणेश धोंडे, नवनाथ धामोरे, संदिप ढगे, सुहास भालेराव, जयेश हरनस्कर, विशाल निमसे संदिप शेलार सह गोटूंबे आखाडा व डिग्रस येथील महीला व पुरुष या कार्यक्रमास उपस्थीत होते. उपस्थितांना रोपे वाटप करून कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर अल्पोपहार देण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.रवींद्र कोळसे यांनी केले व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री.रवींद्र भिंगारदे व जयेश हरनस्कर यांच्यावतीने योग्य आयोजन करण्यात आले होते.
Leave a reply