बिलोली प्रतिनिधी- साईनाथ गुडमलवार
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील दि.भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेचा पाचवा वर्धापनदिन दि. ५ जून रोजी येथील शाखेत मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच संपूर्ण शाखेस फुलांनी सजवण्यात आले होते तसेच भव दिव्य स्वागत रांगोळी काढण्यात आली होती.
यावेळी दि भाग्यलक्ष्मी महिला बँकेच्या अध्यक्षा सौ. सीमा आतनूरकर यांचा अध्यतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपाध्यक्षा सौ.रेखा मोरे, संचालिका सौ.रेखाताई ठक्करवाड, संचालक लक्ष्मण कुलकर्णी, सबनिस सर,कुंडलवाडी शाखेचे सल्लागार श्रीमती शैलजा इनामदार, राजेश्वर उत्तरवार, दिनेश दाचावार,विजय कुंचनवार, सुरेखा किनगांवकर आदी उपस्थित होते. यावेळी येथील बँकेचे शाखाधिकारी बालकिशन कौलासकर यांनी शाखेचा सविस्तर आढावा दिला. त्यामधे कर्ज सहा कोटी सोळा लाख तेहत्तीस हजार तर ठेवी एक कोटी शहाएंशी हजार सोळा लाख, निव्वळ नफा दहा लाख चौपन्न हजार रूपये शाखेस उत्पन्न मिळाल्याची माहिती दिली. यावेळी सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी येथील बँकेचे अधिकारी कपिल कदम, लिपिक जक्कावाड, पोगालवार उपस्थित होते. सेवक जोशी विनायक, विनोद कंदकुर्ते, लक्ष्मीबाई नामुलवाड यांनी बैठक यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Leave a reply