Disha Shakti

इतर

आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार, खासदार सुप्रिया सुळे संतापल्या…

Spread the love

प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे :  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज आळंदीमधून प्रस्थान होत आहे. मात्र मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावेळी सुळे यांनी सरकारचा निषेध केला आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या -“जे आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडले. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यापुर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. आपल्या साध्या आणि सोप्या शिकवणूकीतून वारकऱ्यांनी देशाला वेळोवेळी दिशा दाखविली आहे. माऊलींच्या दिंडीसोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे”, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

मंदिर व्यवस्थापनाने यावर्षी केवळ ७५ दिंड्यांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वादाचा प्रसंग निर्माण झाला. टाळ भिरकावत वारकऱ्याने पोलिसांना प्रतिकार केल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराबाहेर ही घटना घडली आहे. काही काळ पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, आज सायंकाळी माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल. काल देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं.

केवळ निमंत्रित पासधारकांनाच प्रवेश -दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी करणे, खांदेकरी नियंत्रित संख्या, मंदिरात कमीत कमी लोकांना प्रवेश याबाबत वेळोवेळी बैठका घेत निर्णय घेण्यात आला. पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे म्हणाले, ‘‘यंदा प्रस्थानाला उशीर होऊ नये यासाठी दिंडीतील वारकऱ्यांची संख्या ७५ इतकीच मर्यादित केली. खांदेकरी सव्वाशे, तर सोशल मीडिया पत्रकारांनाही मज्जाव केला आहे. केवळ निमंत्रित पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी नैवेद्याच्या वेळी दर्शन बंद केले जाईल.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!