Disha Shakti

सामाजिक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी यांच्यावतीने पंढरीच्या वारकऱ्यांची केलेली सेवा हे कार्य कौतुकास्पद – मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / प्रमोद डफळ: दिनांक १२ जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून निघणारी संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी व दिंडी यांचे आगमन राहुरी शहरात झालेले असताना या दिंडी मधील वारकऱ्यांना त्यांची आरोग्य तपासणी मोफत औषधे वाटप डॉ माने मेडिकल फाउंडेशन व अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहाय्यक कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सोमनाथ बाचकर साहेब हे होते. तसेच एसबीआय फाउंडेशनच्या डॉ ढोकणे मॅडम केदारी साहेब बाळासाहेब सगळगिळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर दत्ताभाऊ खेडेकर भारत मतकर भागवतराव झडे बाबासाहेब केसकर दादाभाऊ तमनर डॉ.सुरज विटनोर, कौश्याबापू तमनर, सचिन कोपनर ह.भ.प.दत्तात्रय महाराज तमनर केंदळ सोसायटीचे चेअरमन अरुणराव डोंगरे, आप्पा सरोदे, पोपटराव शेंडगे, विशाल सरोदे, आदी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. यावेळी अनेक वारकऱ्यांची तपासणी करून त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानमार्फत प्रमुख पाहुण्यांचे व वैद्यकीय पथकाचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे साहेब यांनी प्रतिष्ठानच्या या कार्यास आपल्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिलजी डोलणर यांनी केले व आभार सोमनाथ जी बाचकर यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!