बिलोली प्रतिनिधी- साईनाथ गुडमलवार बिलोली तालुक्यातील मौजे अर्जापूर येथे गावालगत असलेल्या पांदण रत्या लगत मोठ्या प्रमाणात काटेरी झाडी झुडपे वाढलेली आहेत. परिसरात बर्याच शेतकऱ्यांची शेती आहे. शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी, ये जा करण्यासाठी झाडी झुडूपातुन जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदरील अडचण लक्षात घेऊन गावातील काही तरूण युवकांनी मा.जि.प.सदस्य लक्ष्मण ठक्करवाड साहेब यांना ग्राम पंचायत सदस्य साईनाथ शेट्टीवार व इमितियाज् शेख मा.ग्राम पं.सदस्य गौराजी शेट्टीवार व भूमन्ना हिंगणे यांनी साहेबांची भेट घेऊन यावर काही उपाय करण्याची विनंती केली त्यावेळी साहेबांनी तात्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले.
दि.12.06.23 रोजी कासराळी नगरीचे मा.सरपंच अरविंद ठक्करवाड यांचा हस्ते जेसीबी मशीन ला नारळ फोडून शुभारंभ करण्यात आले. गावा लगत असलेला पांदण रस्ता मोठ्या प्रमाणात दूर अवस्था झालेले आहे. सदरील परिसरामध्ये शेतकऱ्यांचे शेती असल्यामुळे त्यांना ये जा करण्यास मोठ्या प्रमाणात अडचण भासत आहे या सर्व बाबीची विचार करून मा.जि.प सदस्य मा. लक्ष्मण ठक्करवाड साहेबांनी आपल्या स्वखर्चाने परिसर स्वच्छ करण्यासाठी आर्थिक मदत दिल्यामुळे परिसर स्वच्छतेच्या कामाला वेग आला आहे. याबाबत गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी माजी सरपंच धर्माजी शेट्टीवार,साईनाथ शेट्टीवार ग्रा.प.सदस्य,धर्माजी वडेन्ना शेट्टीवार, शालेय समिती अध्यक्ष भुमन्ना हिंगणे, भाऊसाहेब बनबरे,पंढरी कुशोड ग्रा.पं.मा.सदस्य,नरसिंग शेट्टीवार, रमेश शेट्टीवार, बाबुराव हिंगणे.ग्रा. पं.सदस्य, ज्ञानेशेवर मेडेकर व ग्राम पं.सदस्य प्र इम्तियाज शेख,ग्रा.पं.सदस्य प्र गौराजी शेट्टीवार, ग्राम पं.मा.सदस्य मोहन मेडेकर,मोतीराम जाधव, व्यंकट जाधव,ताजुदिन शेख,सायलू शेट्टीवार,यादव शेट्टीवार आदी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.