दिशा शक्ती न्युज / प्रमोद डफळ :राहुरी -श्रीरामपुर एसटी डेपो आगार प्रमुख यांना दिव्यांग बांधवास युनिक कार्ड वर75% सवलत देण्यात यावी केंद्र शासन निर्णय युनिक कार्ड जि.आ.र.क्र. पञ क्र. दिव्यांग 2019 /प्र.क्र.80/अक 2 दि.13/05/2019 /पञ क्र.856 दि.3/05/2019
तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनीही परिपत्रक जारी केलेला आहे. उत्तर अहमदनगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
दि.13/6/2023 रोजी सकाळी 7:22 वाजता राहुरी फॅक्टरी येथील 53% दिव्यांग श्री. किशोर नागले हे एसटी बस क्र. MH 40 AQ6003 या श्रीरामपुर ते नाशिक एसटी बसने प्रवास करत आसताना महिला कंडक्टर ने 53% दिव्यांग आसुन,देखील केंद्र शासनाने दिलेले युनिक कार्ड दाखऊन देखील 75%सवलत दिली नाही आरे वारीची भाषा वापरून आमच्या दिव्यांग बाधवाचा अपमान केला व त्यामुळे फुल टिकिट घ्यावे लागले आशा प्रकारे बर्याच दिव्यांगावर अन्याय होत आहे या पुढे आसे अन्याय होऊ नये याबाबद श्रीरामपुर आगार प्रमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली या वेळी आगार प्रमुख यांनी आश्वासन दिले कि या पुढे आसे होणार नाही आम्ही योग्य ती कारवाई करून त्याबद्दल आपनास कळविले जाईल.
या वेळी निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना उत्तर अ नगर मा.मधुकर घाडगे साहेब, उत्तर अहमदनगर जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, देवळाली प्रवरा शहरसचिव सुखदेव कीर्तने,राहुरी फॅक्टरी प्रहार सैनिक किशोर नागले, श्रीरामपुर तालुका अध्यक्ष सचिन शिरसागर, श्रीरामपुर तालुका महिला अध्यक्षा मायाताई ईंगळे,श्रीरामपुर शहरअध्यक्ष अमोल झांबरे,नेवासा शहरअध्यक्ष जयंत मापारी ,सागर सावंतरकर,गणेश बनसोडे, सोमनाथ हरकल आदि उपस्थित होते.
Leave a reply