अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथे दरसाल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात येते. अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणि अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ही मोठया थाटामाटात साजरी करून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वर्षी ही महाराष्ट्र शासनाने अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून महिला व बाल कल्याण विभागामार्फत स्त्री सशक्ती करण करण्यासाठी तसेच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गुणगौरव करून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शेरी येथील अंगणवाडी कर्मचारी महिला सेविका सौ. मंगल सोपान काकडे व मदतनीस सौ. बिस्मिल्ला शेख यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.शेरी येथील अंगणवाडी क्रमांक.60. ला या पूर्वीही आदर्श अंगणवाडी पुरस्कार मिळालेला असून जिल्ह्यात स्मार्ट अंगणवाडी म्हणून मोठी निर्माण केली असून मदनतनीस सौ.बिस्मिल्ला शेख हिस आदर्श पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मंगल काकडे ह्या गेली चालीस वर्षांपासून सेविका म्हणून कार्यरत असून सेविका व मदतनीस यांच्या विशेष मेहनतीने विविध उपक्रम योजना राबवून शेरी अंगणवाडीचा काया पालट करून सुंदर, छान बनवली. लहान बालकांना योग्य मार्गदर्शन करून संस्कार करून जडणं घडण करून गुणवत्ता वाढवली. राजबेट येथील अंगणवाडी सेविका मनीषा डोमाळे व मदतनीस यांस्मिन शेख यांना पण अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शेरी चिखलठाण येथील ग्रामपंचायत मार्फत लोक नियुक्त सरपंच डॉ. सुभाष काकडे व ग्रामपंचायत सदस्य यांनी अंगणवाडी महिला कर्मचारी यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेत हा पुरस्कार जाहीर केला. यावेळी उपस्थित आबासाहेब काळनर, सुभाष बाचकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष इसाक सय्यद, दीपक काळनर, संतोष काळ नर, अल्ताफ शेख, धीरज टेमकर, विनोद काळनर, सिकंदर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
शेरी चिखलठाण येथे अंगणवाडी कर्मचारी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला

0Share
Leave a reply