देगलूर प्रतिनिधी / ज्ञानोबा सुरनर : लोकशाहीचा चौथा व मजबूत आधारस्तंभ म्हणजे पत्रकार मात्र अनेकांची नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात पत्रकारांची मोठी गैरसोय होत होती. निर्भीडपणे समाजातील विविध समस्या आपल्या लेखणी तथा चैनलच्या माध्यमातून समाजासमोर मांडणाऱ्या या पत्रकाराला विसाव्यासाठी जागा उपलब्ध नसणे म्हणजे पत्रकारावर एक प्रकारचा अन्याय आहे. याच अनुषंगाने राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने देगलूर येथील नगर परिषदेचे मुख्यधिकारी यांच्यासोबत देगलूर येथे पत्रकार भवनाची निर्मिती करण्यासाठी विस्तृत अशी चर्चा करण्यात आली. शिवाय पत्रकारांची होणारी गैरसोय याबाबत ही चर्चा करण्यात आली.
चर्चेअंती मुख्याधिकाऱ्यानी सकारात्मकता दाखवत लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले यापूर्वी वरिष्ठ पत्रकारानी देगलूर येथे पत्रकार भवनाची निर्मिती करावी यासाठी अनेक प्रयत्न केले देगलूर येथे नव्याने स्थापन राष्ट्रीय पत्रकार संघ भारत या संघटनेने आज निवेदनाद्वारे पत्रकार भावनाची निर्मिती करण्यासंदर्भात मागणी केली व तसेच नगरपरिषद देगलूर येथील सभागृहात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे छायाचित्र लावण्यात यावे अशी ही मागणी करण्यात आली.
सतत पाठपुरावा करून जोपर्यंत पत्रकार भवन मिळणार नाही व पत्रकारांची गैरसोय टाळली जाणार नाही तोपर्यंत सतत पाठपुरावा करत राहणार अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली यावेळी निवेदनावर जिल्हाध्यक्ष संजय हळदे, जिल्हा सचिव इर्शाद पटेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रभारी शशिकांत पटणे, तालुका अध्यक्ष योगेश जाकरे तालुका उपाध्यक्ष शहाजी वरखिंडे, कोषाध्यक्ष ज्ञानोबा सुरनर, संयोजक सुभाष वाघमारे व आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.