Disha Shakti

इतर

पंढरीच्या वारीसाठी लालपरी सज्ज; एसटीच्या ३०० विशेष गाड्यांची साेय

Spread the love

प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : आषाढी एकादशीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी नगर एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. वारकरी वैष्णवांची वारी सुखकर होण्यासाठी यंदा राज्य परिवहन महामंडळातर्फे नगर जिल्ह्यातून ३०० जादा बसेस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

महाराष्ट्राचे दैवत म्हणून लोकमानसात अढळ स्थान प्राप्त असलेल्या विठ्ठलाच्या उपासनेला अनन्य साधारण महत्व आहे. आषाढी एकादशी २९ जुलै रोजी आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जिल्ह्याभरातून भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. यंदा देखील राज्य परिवहन महामंडळातर्फे भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी भाविकांच्या मागणीनुसार जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविकांना आवाहन
नगर शहरातील तारकपूर बस स्थानकातून पंढरपूरला जाण्यासाठी विशेष बस सेवा उपलब्ध केली जाणार आहे. २५ जून ते ४ जुलैपर्यंत या जादा गाड्या पंढरपूरकडे रवाना होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!