राहुरी तालुका प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : श्री. क्षेत्र पाथरे येतील दिंडीचे ब्राम्हणी मोठ्या थाटामाटात आगमन झाले या दिंडी ब्राह्मणी येथे मुक्काम असतो श्री. नारायण कृष्णाजी तांबे गुरुजी यांच्या निवासस्थानी होता तसेच दुसऱ्या दिवशी चहापाणी व नाश्ता श्री पंढरीनाथ बानकर, गणेश बानकर तसेच बहिरोबा नगर येथील सर्व ग्रामस्थ यांच्यातर्फे चहा पाणी नाश्त्याची सोय करण्यात आली होती. त्यासाठी येथील सर्व ग्रामस्थ दिंडीचे स्वागत केले.
यावेळी अशोक वाकडे, रमेश सुरशे, योगेश ठुबे, पत्रकार ज्ञानेश्वर सुरशे. घुगरे व वाकडे कुटुंब संजय खोसे. संदीप पंडित, बाबासाहेब लोखंडे, जालिंदर वाकडे, विनायक जाधव, अमोल शिकारे, अर्जुन वाघमारे, रमेश बानकर, देवराम बिरंगल, रवी वने, चंद्रकांत जाधव, भारत डोळस, संकेत शिकारे, सागर जाधव, विजू साठे, सुमा साठे तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमात फुगड्यांचा देखील कार्यक्रम झाला. वारीतील प्रमूख वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सर्वांनी आपापल्या घरासमोर सडा रांगोळी घालून सर्व रस्ता शोभित केला होता. त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
Leave a reply