जिल्हा प्रतिनिधि / मिलींद बच्छाव : दिनांक 21 जून 2023 रोजी मौजे कांडाळा येथील सर्व सभासदांची बैठक घेण्यात आली त्या अनुषगाने कांडाळा येथील सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पद हे रिक्कत होते म्हणुन आज रोजी नांदेड जिल्हा मद्यवर्ती बँकेचे सेकेट्री नंदकुमार गादेवार साहेब यांच्या उपस्थिती मध्ये बैठक घेऊन सगळ्या सांग चालकाच्या संचालक सभासदांच्या मताने चेअरमन पदी दिलीप पा. कांडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी नायगाव कृषी बाजार उत्पन्न समितीचे माजी संचालक परसराम पाटील जाधव, कांडाळचे ज्येष्ठ नागरिक शंकर ज्ञानोबा संत्रे, काळबा रानबा भद्रे ,हणमंत शंकरराव कदम, लक्ष्मण पा. जाधव, विक्रम पा.जाधव,माजी उपसरपंच विजय पाटील जाधव,माजी सरपंच मारोती कांबळे, दिगांबर भद्रे, कांडाळा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक पी. वाघमारे साहेब, बालाजी पाटील जाधव कीसन मोतीराम इरेवाड, उत्तम रामचंद्र इरेवाड जीवन पाटील जाधव, श्रीहरी पाटील कदम, आनंदा संत्रे, कैलास पाटील कदम, राजेश शेळके, मारुती पाटील जाधव इत्यादी नागरिक उपस्थित होते.
कांडाळा येथील सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप पाटील कांडाळकर याची बिनविरोध निवड

0Share
Leave a reply