प्रतिनिधी / रमेश खेमनर : राहुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस ठाणे राहुरी प्रभारी अधिकारी म्हणून धनंजय अनंतराव जाधव पोलीस निरीक्षक यांनी बुधवारी दि.२१ जून रोजी संध्याकाळी उशिरा पोलीस ठाण्याचा प्रभारी पदाचा पदभार हाती घेतला आहे. माजी पोलीस निरिक्षक मेघशाम डांगे सेवानिवृत्त झाल्यापासून मागील २१ दिवसापासून पोलीस ठाण्यास प्रभारी अधिकाऱ्याची प्रतिक्षा होती, पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.करपे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या शुक्रवारी १६ तारखेला बदल्या केल्या होत्या. या सर्वसाधारण बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात बदलून आलेले होते जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांची नेमणूक राहुरी येथे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून केली आहे.पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे अहमदनगर येथे येण्यापूर्वी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात पोलीस ठाणे पंढरपूर येथे ५ वर्षे कार्यरत होते.
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहेत. १९९३ च्या बॅचचे पोलीस उपनिरीक्षक असून त्यांनी यापूर्वी चंद्रपूर, नक्षलग्रस्त भागात गडचिरोली, पुणे शहर, कोल्हापूर व सोलापूर ग्रामीण येथे कर्तव्य बजावले आहे. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना मागील ३० वर्षाच्या काळामध्ये उत्कृष्ट आणि कौशल्यपूर्ण कामगिरीसाठी एकूण २०० बक्षिसे आहेत, तसेच राज्य सरकारचे खडतर सेवा पदक व केंद्र सरकारचे अंतर्गत सुरक्षा सेवा पदक देखील प्राप्त करण्यात आलेले आहे.
पोलीस निरीक्षक जाधव यांनी राज्यात घडलेल्या काही महत्त्वाच्या हत्याकांडामध्ये तपास पथकामध्ये महत्वपूर्ण कामगिरी पार पाडलेली आहे.पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे कार्यतत्पर व कर्तव्य कठोर आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि अंमलदार यांच्याशी कामकाजाबाबत सविस्तर स्पष्ट सूचना आणी आदेश दिले आहेत.
शासन आपल्या दारी हा शासनाचा सेवा हमी उपक्रम अंतिम लक्ष्य ठेवून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल या साठी प्रयत्नरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Leave a reply