Disha Shakti

इतर

विहिरीत सापडले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह, पाथर्डीमध्ये खळबळ

Spread the love

विशेष प्रतिनिधी  / इनायत आत्तार   :  दि, 22 जून : पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव हद्दीतील दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहरीत चार मृतदेह आढळले आहेत. पोल्ट्रीफार्मवर कामासाठी आलेल्या कुटुंबातील एक महिला , तिचा एक मुलगा आणि दोन मुली असे चौघांचे मृतदेह विहिरीत सापडले आहेत. पोलिसांनी मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. चौघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

झोपल्यानंतर पुन्हा नवरा बायकोत वाद झाल्याचे समजले. त्यानंतर सकाळी पोल्टीफार्मवर काम करणारा एकजण विहरीवर मोटार सुरु करायला गेला होता. तेव्हा निषीधा धम्मपाल सांगडे (वय-दीडवर्षे) हिचा मृतदेह विहरीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. पोल्ट्रीपार्मचे चालक दिपक गोळक यांना माहीती मिळताच त्यांनी पोलिसात खबर दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विहिरीमध्ये 30 ते 35 फुट पाणी होते. विजपंपाच्या सहाय्याने पाणी उपसण्यात आलं. तीन ते चार तास पाणी उपसल्यानंतर कांचन धम्मपाल सांगडे ( वय 26 वर्षे) , निखील धम्मपाल सांगडे( वय-6 वर्षे) , संचिता धम्मपाल सांगडे( वय- 4 वर्षे) असे तिघांचे मृतदेह सापडले.  कांचन आणि तिची तीनही मुलं विहरीत मृत अवस्थेत सापडले.

पोलिसांनी कांचनचा नवरा धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. चौघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. धम्मपाल सांगडे (वय-30 वर्षे) हा करोडी, ता.हादगाव, जि.नांदेड येथील मुळ रहिवासी आहे. तो बायको कांचन आणि एक मुलगा, दोन मुलींना घेऊन दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीचे काम करत होता. धम्मपाल हा व्यसनी असल्याचे पोलीस तपासात समजले आहे. पोलिसांनी धम्मपालला ताब्यात घेतले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!