श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे : प्रहार श्रमिक सेवा संघाचे वतीने विधवा भगिनिंसाठी मोठे योगदान दिले जात असल्याचे प्रतिपादन प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांनी केले. प्रहार श्रमिक सेवा संघाचे वतीने देवळाली प्रवरा येथे जागतिक विधवा दिन साजरा करण्यात आला. त्यामध्ये विधवेसह २५ महिलांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालया मार्फत दिले जाणारे सुरक्षा साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे बोलत होते.
प्रसंगी प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, सचिव बाळासाहेब कराळे, इम्रान शेख यांचेसह एकल भगिनी वर्षा चव्हाण, वनिता मांजरे, लिलाबाई कडू, हर्षला चव्हाण, बाळासाहेब कोळसे, राजेंद्र उंडे, उज्वला मांजरे, रेखा जाधव, अनिता चव्हाण, मनीषा उंडे, गीतांजली चव्हाण, सहिस्ता शेख, दिपाली भालके, सुवर्णा मोकळ, अनिल शिंदे, बंडू मांजरे, गोरक्षनाथ भालके, वसीम शेख, अतिक पठाण, सोनाली चव्हाण, मीरा पवार, आदी बहुसंख्य लाभार्थी कामगार उपस्थित होते. देवळाली प्रवरा येथील प्रहार श्रमिक सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांचे हस्ते देवळाली प्रवरा येथील विधवा भगिनी वर्षाताई चव्हाण हिच्यासह 25 महिलांना जवळपास अडीच लक्ष रुपये किमतीचे सुरक्षा साहित्य वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी प्रहार श्रमिक सेवा संघाचे कामाचे कौतुक करून सर्व एकल महिला व कामगारांनी फक्त या सुरक्षा साहित्यावर अवलंबून न राहता कामगार मंत्रालयामार्फत दिले जाणारे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व लाभ घ्यावेत असे आवाहन केले.
प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी केले. त्यामध्ये त्यांनी प्रहार श्रमिक सेवा संघाच्या वतीने कामगारांना दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा बद्दल माहिती देवुन असंघटीत कामगारांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
Leave a reply