बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : देशाच्या ऐक्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे,थोर नेते भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त आज ठक्करवाड साहेब यांचा अमृतधाम गो-शाळा कासराळी येथे मान्यवरांचा हस्ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा प्रतिमेचे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 9 वर्ष नुकतेच पूर्ण केली आहे. त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचा वतिने देशभरात महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे.
हे अभियान बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबविला जात आहे या अनुषंगाने आज बिलोली तालुक्यातील लोहगांव सर्कल मधे जनसंपर्क करून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. त्यामध्ये कासराळी,लोहगांव, डोणगांव, भोसी, सावळी या गावांना भेटी देऊन केंद्र शासनाचा योजनेसंदर्भात सविस्तर माहिती जनसामान्यापर्यंत पुस्तकाचा माध्यमातून माध्यमातून पोहोचविण्यात आले.
या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी बिलोली देगलूर विधानसभेचे प्रमुख तथा माजी आमदार सुभाषराव साबणे साहेब उमाकांतराव गोपछडे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तालुका अध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे, कासराळी नगरीचे माजी सरपंच अरविंद ठक्करवाड, आबारावजी संगनोड जिल्हा सरचिटणीस ओबीसी नागनाथ पा.माचनुरकर तालुका समन्वयक, शैलेश पाटील चिंचाळकर जिल्हा उपाध्यक्ष युवा मोचा,भाऊसाहेब बनबरे, संदीप पाटिल रामपुरे ता.उपाध्यक्ष युवा मोर्चा, आदी मान्यवर मंडळींनी मार्गदर्शक केले.त्यांचासमेत शंकराव तोटावाड रेड्डी, बालाजी देशमुख,अशोक पा जाधव, नागेश श्रीरामे,अरविंद देशाई,किशनराव म्हेत्रे,शंकर गंगुलवार,संभाजी टोम्पे, बालाजी पा हाळे, गंगाधर पा नुच्चे, राजेश पा.कंदमवाड, गंगाधर बिगेवार, बालाजी पा गेटकेवार, इरवंत याबाजी, श्रीकांत माचलोड, लक्ष्मण दंलोड, योगेश काप्रतवार, साईनाथ पांचाळ व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येनी उपस्थित होते.
Leave a reply