सोलापूर प्रतिनिधी / नागनाथ पाटील : आदानी समूहाचे चेअरमन श्री गौतम आदानी यांच्या 61 व्या वाढदिवसाची औचित्य साधून महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.यावेळी मोटार वाहन निरीक्षक किरण खंदारे साहेब मोटर वाहन निरीक्षक विनोद जाधव मोटर वाहन निरीक्षक चंद्रमोहन साळुंखे तसेच अक्षय ब्लड बँकचे डॉक्टर अजय रुपनवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
माणसाचा जन्म ते मृत्यूपर्यंत शरीरात स्रावरणारा रक्त कधीच मोबदला मागत नाही. परंतु त्याच रक्ताची एखाद्याला गरज भासली तर त्याची मुल्य ही करता येत नाही. अशावेळी मरणाच्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तीचा रक्तदानामुळे प्राण वाचवण्यासाठी मौल्यवान ठरणार असल्याचे प्रतिपादन सीमा तपासणी नाका नाक्याचे व्यवस्थापक श्री.प्रमोद पाटील सर यांनी केले.
सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 असलेल्या नांदणी (तालुका दक्षिण सोलापूर ) सीमा तपासणी नाका येथे उद्योगपती तसेच आदानी समूहाचे चेअरमन श्री गौतम आदानी यांच्या 61 व्या वाढदिवसाची औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ६३ जणांनी रक्तदान केले.यावेळी मोटर वाहन निरीक्षक किरण खंदारे यांनी उपस्थिती यांना रक्तदान का करावे याविषयी उपस्थिती मार्गदर्शन केले.
या वेळी नांदणी येथील प्रतिष्ठित व्यक्ती शिवानंद सुरवसे MBCPNL चे कर्मचारी नांदणी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश पाटील यांनी केले तसेच सूत्रसंचालन अजित गोडसे यांनी केले. तर शेवटी जयप्रकाश यादव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बिराप्पा सुरवसे ,अनिल पवार, परमेश्वर कुलकर्णी, खाजासाहेब शिवशरण,तेजेस म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले.
Leave a reply