Disha Shakti

सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनली डिजिटल स्कूल

Spread the love

शेख युनूस / अ.नगर : अहमदनगर जिल्हातील जि.प.प्राथ. शाळा बोटा ही आज डिजिटल स्कूल बनली आहे. शाळेतील सर्व 6 Smart TV संच आणि 4 कॉम्पुटर यांना हायस्पीड इंटरनेट केबलद्वारे कनेक्ट करण्यात आले आहे. सन्माननीय योगेश दगडू जाधव यांनी संपूर्ण 1वर्षाचे इंटरनेट शाळेसाठी फ्रि दिले आहे.त्यांना खूप धन्यवाद पालकसहभागातून इतर जोडणी खर्च करण्यात आला आहे. आजरोजी इ.1 ली ते 4 थी वर्गांची 215 पटसंख्या असून KG वर्गांत 50 विद्यार्थी शिक्षण घेत आहे.पटसंख्येत संगमनेर तालुक्यात ही शाळा प्रथम 3 क्रमांकात आहे.

शिष्यवृत्ती-नवोदय पुर्वतयारी साठी इ.3 री, 4 थी साठी मंथन स्पर्धा परीक्षा जादा तासिका घेण्यात येतात. बोटा ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, बोटा गावातील विविध संस्था, ग्रामस्थ-पालक,माजी विद्यार्थी यांचे सदैव सहकार्य मिळत आहे.ग्रामपंचायत मार्फत शौचालय बांधकाम सुरू होत आहे. नुकतेच त्याचे भुमीपुजन करण्यात आले आहे.आधुनिक शिक्षणाची कास धरत शिक्षणात दीक्षा सारख्या शैक्षणिक अँपचा वापर वाढविण्यासाठी नक्कीच ह्या इंटरनेटचा खूप उपयोग होईल. शाळेला श्री.तुकाराम विष्णू झिंजाड सर हे मुख्याध्यापक आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!