बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी पावसाच्या आगमनाने सुखावला आहे. दि (२५) रविवारी दुपारपासून बिलोली तालुक्यात हलक्या सरी बरसू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जून महिना संपत चालला तरी मान्सून सक्रिय न झाल्याने सर्वांच्याच पुढे चिंतेचे ढग दाटले होते.
मान्सून पूर्व पावसानेही अपेक्षित हजेरी लावली नव्हती. तरी देखील शेतक-यांनी पेरणीपूर्वीची कामे आटोपून शेत तयार करून ठेवली आहेत. मात्र, पाऊस लांबल्याने खरीपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. पेरण्या लांबल्यास शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडून पडणार अशी विचित्र अवस्था शेतकऱ्यांची झाली होती.
ऐन पावसाळयात कडक ऊन व वाढलेल्या उकाड्याने जनता हैराण झाली होती. त्यातच पावसाची चिन्हे दिसत नसल्याने मान्सून दाखल होणार की नाही? याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. पावसाच्या आगमनाने सर्वत्र समाधान व्यक्त होत असले तरी अजूनही भरपूर प्रमाणात पाऊस होणे आवश्यक आहे.
Leave a reply