Disha Shakti

राजकीय

धनराज गाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर विविध उपक्रमाचे आयोजन

Spread the love

राहुरी प्रतिनिधीं / रमेश खेमनर : अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व शालेय साहित्य वाटपाच्या  कार्यक्रमाचे आयोजन उद्या मंगळवार दि. 27 जुन 2023 रोजी सकाळी 10:00 वाजत बारागाव नांदुर येथील मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रमूख उपस्थितीती राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे, आमदार निलेश लंके, माजी आमदार भानुदास मुरकुटे, पै.रावसाहेब खेवरे, युवा नेते राजूभाऊ शेटे सह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी राहुरी तालुक्यातील सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन स्व.शिवाजीराजे गाडे पाटील मित्र परिवार, शेतकरी मंडळ राहुरी तालुका व धनराज शिवाजीराव गाडे युवा प्रतिष्ठान यांच्याकडून करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!